अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अवैध स्क्रॅपची वाहतुक करणारा कंटेनर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर एमआयडीसी पकडला. कंटेनर चालक शैलेंद्र सोरन सिंह ( रा. खड्डा कॉलनी, स्वरूपनगर, नॉर्थ वेस्ट दिल्ली ) याला अटक करण्यात आली असून १ कोटी ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईचा सूचना दिल्या.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत कंटेनर क्र.(आर.जे- ६९.जी. डी, ३६०५) मध्ये बेकायदेशीरपणे तांबे ऍ़ल्युमिनीअमचा माल असल्याची माहिती मिळाली. पथकाने नगर एमआयडीसीत पहाणी केली असता सदरचा कंटेनर चालकासह मिळाला.
चालकाकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस केली असता त्याने मुद्देमालाची पावती दाखविली. पावतीत तफावत दिसुन आल्याने कंटनेर चालकाकडे अधिक विचारपूस केली असता त्याने ट्रान्सपोर्टचे मालक पुरूषोत्तम तिलकराज अग्रवाल यांच्या सांगण्यावरून मालाचे पुरवठादार एच. एस. ट्रेडींग कंपनी सदयंकुप्पम, तामीळनाडू यांचेकडील मालापैकी तांब्याचे पाईप असलेले बंडल हे बब्बु ( पुर्ण नाव माहिती नाही ) याचा मित्रांनी वाघोली येथून कंटेनरमध्ये भरून दिला असल्याची माहिती दिली.
आरोपीच्या ताब्यातील ३० लाख रुपये किंमतीचा कंटेनर, १ कोट ३८ लाख रुपये किंमतीचे १८ हजार किलोग्रॅम वजनाचे तांबे, ऍ़ल्युमिनीअम धातुचे स्क्रॅप असा १ कोटी ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०३ (२), ३३६ (३), ३४० (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे मार्गदर्शनाखाली पथकातील अंमलदार संतोष लोढे, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड यांनी बजावली आहे.