spot_img
अहमदनगरजनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या तीन ठिकाणी एलसीबीचे छापे; १७ गोवंशीय जनावरांची...

जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या तीन ठिकाणी एलसीबीचे छापे; १७ गोवंशीय जनावरांची सुटका

spot_img

कर्जत | नगर सह्याद्री

जिल्ह्यातील कर्जत शहरात कत्तलीसाठी तीन ठिकाणी डांबून ठेवलेल्या गोवंशीय १७ जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली. या संदर्भात तीन गुन्हे दाखल करण्यात आली असून आरोपींकडून दोन लाख १५ हजार रुपये किमतीची १७ जनावरे जप्त करण्यात आली आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश धोत्रे, शाहीद शेख, सोमनाथ झांबरे, रोहित मिसाळ, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, मनोज लातूरकर, उमाकांत गावडे व अरुण मोरे अशांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाला कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवली असल्याची माहिती मिळाली. तेव्हा शनिवार १७ मे २०२५ रोजी पथकातील पोलीस अंमलदारांनी कर्जत शहरामध्ये मिळालेल्या माहितीवरून ०३ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. तेव्हा त्यांना कत्तल करण्याचे उद्देशाने गोवंशीय जनावरे निदर्यतेने डांबून ठेवल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी पंचासमक्ष छापे टाकून कारवाई केली.

कर्जत पोलीस स्टेशनला या संदर्भात ०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. छाप्यात दोन लाख १५ हजार रुपये किमतीची १७ गोवंशीय लहान मोठी जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत. कर्जत पोलीस स्टेशन व गु. र. नं ३०६/२०२५ अन्वये फरार आरोपी मुन्ना हुसेन कुरेशी (मोहल्ला, कर्जत) याच्या ताब्यातील ६० हजार रुपये किमतीची सहा जनावरे ताब्यात घेण्यात आली. अतीक कुरेशी, निसार कुरेशी (पूर्ण नाव माहीत नाही, रा. कर्जत, दोघेही फरार) यांच्या ताब्यातून ७० हजार रुपये किमतीची सहा गोवंशीय जनावरे तर अशोक बाजीराव लोंढे (रा. थेरवाडी, फरार) व शोएब कुरेशी (रा. कर्जत, फरार) याच्या ताब्यातून ८५ हजार रुपये किमतीची पाच गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व कर्जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० हजार जमा होणार? मे-जूनचा हप्ता एकत्र येणार…?, वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला...

हॉटेल चालकानी तरूणीला संपवल!, बड्या नेत्याच्या गावात ‘धक्कादायक’ प्रकार

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या तरुणीची हत्या करून मृतदेहाची...

आजचे राशी भविष्य! सोमवार ‘या’ राशींसाठी लाभदायक महादेवाची कृपा..!, तुमची रास काय?

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल,...

अपहाराच्या गुन्ह्यातून डॉ. अनिल बोरगे यांचे नाव वगळण्यास महापालिकेचा आक्षेप; आयुक्तांनी स्पष्ट केली भूमिका

  डॉ. अनिल बोरगे यांनी अपहार उघड झाल्यानंतरही पोलिसात फिर्याद देऊन गुन्हा दाखल का केला...