spot_img
अहमदनगरएलसीबीची मोठी कारवाई! १२२५ गोण्यात काय गवसलं?

एलसीबीची मोठी कारवाई! १२२५ गोण्यात काय गवसलं?

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 19 लाख 53 हजार रुपयांचा गुटखा पकडला. याप्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे टाकलेल्या छाप्यात सुगंधित तंबाखू, पान मसाला आहे.

खर्डा परीसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत याच अनुषंगाने खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील धनेगाव या ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मोठी कारवाई केली आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला धनेगाव येथे गुटख्याचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सायंकाळी साडेसात वाजता छापा टाकला.

हीरा पान मसाला असे नाव असलेल्या गुटख्याच्या 1225 बॅग, 3 लाख 93 हजार 120 रुपये कीमतीचे रॉयल 717 असे नाव असलेली सुगंधित तंबाखूच्या 63 बॅग व पाचशे रुपये कीमतीचा निळ्या रंगाचा बारदाणा असा एकुण 19 लाख 53 हजार 620 रुपये कीमतीचा गुटखा पकडण्यात आला आहे.

य प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ रोहित मधुकर मिसाळ यांनी खर्डा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड हे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...