spot_img
अहमदनगरलक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला; तिघे जण पोलिसांच्या ताब्यात

लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला; तिघे जण पोलिसांच्या ताब्यात

spot_img

नगर-दौंड रोड अरणगाव परिसरातील घटना | तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर नगर-दौंड महामार्गावरील अरणगाव परिसरात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगरमधील पाथड तालुक्यातील दैत्यनांदूर येथे ओबीसी समाजासाठी आयोजित मेळाव्यासाठी ते चालले होते. अरणगाव परिसरातील एका हॉटेलवर ते नाष्टा करण्यासाठी थांबले होते. पुढे जात असतांनाच त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. लक्ष्मण हाके यांना काही झालेलं नाही. परंतु, मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, नगर तालुका पोलिसांनी गोरख दळवी, संभाजी सप्रे, गणेश होळकर या तिघा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

सविस्तर असे की, पाथड तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी लक्ष्मण हाके पुण्याहून पाथडकडे चालले होते. अरणगाव परिसरातील एका हॉटेलवर ते चहा पाणी व नाष्ट्यासाठी थांबले होते. पुढे जात असतांनाच पावणे बारा वाजेच्यासुमारास हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तेथे तणावाची परिस्थिती तयारी झाली होती. हाके यांच्यासोबत पोलिस बंदोबस्त असल्यामुळे पोलिसांनी नियंत्रणात आणली. आणि हाके यांचा ताफा बाह्यवळण रस्त्याने सोलापूर रोडकडे रवाना झाले.दरम्यान, हाके यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेते तिघा जणांना ताब्यात घेतले आहे.

हल्लेखोरांना पोलिसांचा धाक राहिला नाही; हाके यांनी जरांगे पाटलांनाही सुनावले
या हल्ल्‌‍याची चौकशी पोलीस डिपार्टमेंट आणि शासनाने करावी. आता संशय नेमका कुणावर घ्यायचा? आतापर्यंत आठ ते नऊ वेळा माझ्यावर रहल्ल्‌‍याचा प्रयत्न झाला आहे. हल्लेखोरांनी 2 वाहनांवर हल्ला केला आहे. 2 गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत. 2 पोलीस व्हॅन असताना, 10 ते 12 पोलिसांचा स्टाफ असताना हल्ला झाला.

मोठ्या लाकडी बांबू आणि दगडाने हल्लेखोर हल्ला करत असतील, तर यांना कायदा आणि पोलिसांचा धाक आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. यांना पोलिसांचा धाक उरलेला नाही, असं हाके म्हणाले. आमचा गुन्हा काय तर, आम्ही ओबीसीचे प्रश्नाला वाचा फोडतोय,असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले. दरम्यान वाहनावर झालेल्या हल्ल्‌‍यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी, प्रसिद्धीसाठी हल्ले करवून घेतात, असं ते म्हणाले. यावर हाके यांनी जरांगे मूर्ख माणूस आहे. पोलिसांसमोर आम्ही स्टंट करतो का? आतापर्यंत 8-9 वेळा हल्ले झाले. ते हल्ले स्टंट होता का? असं ते म्हणाले.

तिघे जण ताब्यात: एसपी सोमनाथ घार्गे
शनिवारी बारा वाजेच्या दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके दौंडकडून पाथड कडे जात होते. नगर तालुक्याच्या हद्दीत एका ठिकाणी नाष्ट्यासाठी थांबले होते. नाष्टाकरुन परत जात असतांना काही इसमांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्यापैकी तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्ल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

प्रसिद्धीसाठी स्वतःच्याच गाडीवर हल्ले ः मनोज जरांगे
ओबीसी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जात असताना लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्‌‍यात हाके यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र या घटनेवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. प्रसिद्धीसाठी स्वतःच्याच गाडीवर हल्ले करून घेतात. स्टंटबाज लोकांकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही, असा टोला लगावला. ही सर्व नाटके प्रसिद्धीसाठीच आहेत. हे लोक दगड मारून घेतात, हल्ले करून घेतात आणि मग त्यावर राजकारण करतात. अशा जातीवाद पसरवणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचं कारण नाही, असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये चाललंय काय? डिलिव्हरी बॉयवर सपासप वार, वडारवाडीत राडा, मुकुंदनगरमध्ये प्राणघातक हल्ला, वाचा क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील केडगाव परिसरात घरासमोर पार्क केलेली टाटा हॅरियर गाडी रात्रीच्या...

शनि शिंगणापूर मंदिर कार्यालयास ठोकले सील; कलेक्टरांकडून ‘देऊळ कार्यालय बंद’

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शनी शिंगणापूर देवस्थानचे कार्यालय जिल्हा प्रशासनाकडून सील करण्यात आले...

नगरकरांनो सतर्क राहा! जिल्ह्यासाठी यलो अलर्ट, हवामान खात्याची महत्वाची अपडेट..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 27 ते 29 सप्टेंबर 2025...

मर्चंट्‌‍स बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत; सभासदांनासाठी खुशखबर, बँक काय देणार भेट?, वाचा सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण करणाऱ्या अहमदनगर मर्चंट्‌‍स बँकेला रिझर्व्ह बँकेने शेड्युल्ड बँकेचा...