spot_img
ब्रेकिंगबोगस कुणबी प्रमाणपत्रबाबत लक्ष्मण हाकेंचे मोठे विधान; जरांगे, भुजबळ, राऊत काय म्हणाले...

बोगस कुणबी प्रमाणपत्रबाबत लक्ष्मण हाकेंचे मोठे विधान; जरांगे, भुजबळ, राऊत काय म्हणाले पहा

spot_img

जालना / नगर सह्याद्री 
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले आहे. मंत्री छगन भुजबळ, मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे, मंत्री धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर अशा १२ नेत्यांच्या मंत्र्यांनी आज लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी बोगस कुणबी नोंदी असतील तर कारवाई करुफ असे सरकारने आश्वासन दिल्याचे सांगितले.

छगन भुजबळ यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली. ज्यामध्ये त्यांनी दोन मुद्दे जवळ- जवळ मान्य केल्याचे सांगितले आहे. मात्र सगेसोयर्‍यांचा अध्यादेशाबाबतचा निर्णय टेनिकल आहे. तो अध्यादेश काढण्याअगोदर सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल, मग त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
तसेच बोगस कुणबी नोंदी देणारे आणि घेणार्‍यांवर कारवाई होईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र शासनचं कुणबी नोंदी वाटत आहे, त्यामुळे या प्रश्नाबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. छगन भुजबळ आणि शिष्टमंडळावर विश्वास होता, म्हणूनच आम्ही त्यांना चर्चेसाठी पाठवले. ते ओबीसी हिताचा जो निर्णय घेतील त्यावर आम्ही चर्चा करु, असेही लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले.

छगन भुजबळ आक्रमक
पंकजा मुंडे यांनी कोणतीही भूमिका घेतली नसताना त्यांचा पराभव केला. सरकार हे १२ कोटी जनतेचे आहे. कुणावरही अन्याय करणार नाही, जर अन्याय केला असा समज झाला असेल तर सरकारने ते दूर केला पाहिजे. लोकसभा विधानसभेतही ओबीसी ला आरक्षण पाहिजे अशी मागणी करायला हवी,  असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

ओबीसींच्या मंचावरून छगन भुजबळांचा एल्गार
मराठा समाजाला आरक्षण द्या. मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे जालना जिल्ह्यातील वडी गोद्री या ठिकाणी उपोषण करत आहेत. या ठिकाणी सरकारकारच्या शिष्टमंडळ पोहोचलं आहे. यावेळी छगम भुजबळ यांनी उपस्थितांना संबोधित केलं. लढाई संपलेली नाही. निवडणुकीच्या आधी सुद्धा, निवडणुकीनंतरही गावागावत हल्ले करण्यात आले. मारपीठ करण्यात आली. पोलिसांनी डोळेझाक केली. हे सर्व पाहून वेदना झाल्या. एक लक्षात ठेवा, कोणी किती मोठी शक्ती असली जेव्हा लोकशक्ती एकत्र येते तेव्हा त्या शक्तीचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही. लोकशाहीमध्ये धनशक्ती किंवा इतर कोणतीही शक्ती नाही तर लोकशक्ती अत्यं मोठी आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

शेळ्या मेंढ्या मोजता तर माणसांची मोजदाद का करत नाही. आमची जात गणना केली पाहिजे. काही मागितलं तर कोर्टात जातात. कोर्ट विचारतं तुम्ही किती टक्के आहात. आम्ही आकडा कसा सांगायचा. ब्रिटिशांनी गणना केली तेव्हा ५४ टक्के होतो. मग आम्ही १०-१२ टक्के आहोत असं कसं म्हणता. करा जातगणना. नितीश कुमारांनी जातजनगणना केली. आम्ही ६५ टक्क्यावर गेलो. आम्ही जातीयवाद केला नाही. त्यांनी जातीयवाद केला, असं म्हणत छगन भुजबळ यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. महात्मा फुल्यांनी जे सांगितलं ते शाहू महाराजांनी सांगितलं. ते बाबासाहेबां संविधानात आणलं आणि आम्हाला न्याय दिला. आमची सर्व लेकरंबाळं काही गाड्यातून फिरत नाही. ते ही अन्नाला मोताद आहे. त्यांची काय परिस्थिती आहे. त्यासाठी हे आरक्षण आहे. त्यात इतर वाटेकरी झाले तर आमचे काय होणार, असं म्हणत छगन भुजबळ यांनी ओबीसींची परिस्थिती विशद केली.

छगन भुजबळांचं आवाहन काय?
तुम्ही सर्व एकत्र राहिलं तर आरक्षण टिकेल. तुम्ही कोणत्या पक्षात आहात याच्याशी मला कर्तव्य नाही. तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षातून ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. मजबुतीने उभं राहा. ओबीसींच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी होऊ देऊ नका. केवळ मतांसाठी हे करणार आहात का. मतांसाठी घाबरू नका. तुम्ही ५४ टक्के एक राहिला तर मुस्लिम, दलित आणि आदिवासी तुमच्यासोबत राहतील. तुम्ही आपआपसात लढत राहिला तर काहीही होणार नाही. एकत्रित या. तू मोठा मी मोठा हा भेदभाव नाही. आपण सर्व सारखे असं समजून कामाला लागा, असं आवाहन छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला केलं आहे.

मी कधीच जातीयवाद केला नाही – मनोज जरंगे पाटील
मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी नेते आणि आंदोलकांनी ते जातीयवादी असल्याचा आरोप केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मी कधीच जातीयवाद केला नाही. मी केवळ माझ्या गोरगरीब बांधवांची मागणी लावून धरली आहे. उलट ओबीसी नेतेच जातीयवाद करत आहेत. मी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे ही माझी मागणी आहे आणि मी ती इथून पुढेही माझी मागणी लावून धरणार आहे. मात्र, आता ओबीसी नेत्यांचे चेहरे उघडे पडले आहेत, सगळ्यांचे बुरखे आता फाटले आहेत, खोटे मुखवटे गळून पडले आहेत.”

काय म्हणाले संजय राऊत?
आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये संघर्ष बघायला मिळतो आहे. एकीकडे मनोज जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या मागणीला विरोध केला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. “आरक्षणावरून राज्यात जो मराठा-ओबीसी संघर्ष सुरू आहे, तो दुर्देवी आहे. कुणाच्याही ताटातलं काढून कुणाला देऊ नये, ही शिवसेनेची (ठाकरे गटाची) भूमिका आहे. आज सर्वच समाजात मागासलेपण आहे. त्याला कारण नरेंद्र मोदी सरकारची धोरणे आहेत, हे सरकार १० वर्षात अपयशी ठरल्याने हे समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

“सरकारने सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करावी”
“बिहारमध्ये वाढीव आरक्षण न्यायालयाने अमान्य केलं आहे. आपल्या राज्यातही आरक्षणावरून संघर्ष सुरू आहे. राज्य सरकारने टीकाऊ आरक्षण देऊ असं म्हटलं आहे. पण हे आरक्षण कसं टीकेल? यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आरक्षणावरून जो संघर्ष सुरू आहे, तो थांबावायचा असेल तर सरकारला सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणं गरजेचं आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“सर्वपक्षीय शिष्टमंडळ हाच एकमेव पर्याय”
“केवळ शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांकडे पाठवून हा प्रश्न सुटणार नाही. जे लोक उपोषणाला बसले आहेत. ते राज्य सरकारवर विश्वास ठेवायला तयार नाही. मनोज जरांगे असतील किंवा लक्ष्मण हाके असतील, यांनी सरकारवर विश्वास नसल्याचे स्पष्ट केलं आहे. अशावेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळ हाच एक पर्याय आहे”, असंही ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...