spot_img
अहमदनगरवकिल दांम्पत्य खून प्रकरण; पाच जणांनी रचला 'ईतक्या' लाखांसाठी कट; साक्षीदाराने सांगितली...

वकिल दांम्पत्य खून प्रकरण; पाच जणांनी रचला ‘ईतक्या’ लाखांसाठी कट; साक्षीदाराने सांगितली आपबीती

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ॲड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी ॲड. मनीषा आढाव (दोघे रा. मानोरी, ता.राहुरी) यांच्या अपहरण आणि नंतर निर्घृण खून प्रकरणी न्यायालयात सुनावणी वेळी सोमवारी (9 डिसेंबर) माफीचा साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी) याने गुन्ह्याची कबुली देत दहा लाख रुपयांसाठी पाच जणांनी मिळून कट रचून वकील दाम्पत्याचे अपहरण केले होते, असे सांगितले. दरम्यान, न्यायालयातच चक्कर आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे सुनावणी स्थगित आली.

राहुरीतील वकील दाम्पत्याच्या खुनामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (वय 32 वर्षे, रा. उंबरे, ता. राहुरी), भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा, ता. राहुरी), शुभम संजीत महाडिक (रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी), कृष्णा उर्फ बबन सुनील मोरे (रा. ता. राहुरी) यांना अटक केलेली आहे. सुरुवातीला राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तपास केला. स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक केली होती. त्यानंतर वकील संघटनांच्या मागणीनुसार घटनेचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला.

सीआयडी पोलिस निरीक्षक वाझे यांनी तपास करून न्यायालयात दीड हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. दरम्यानच्या काळात सरकारकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या खटल्यात नियुक्ती करण्यात आली.सोमवारी प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली. सरकार पक्षाकडून ॲड. उज्ज्वल निकम व मुख्य आरोपी किरण दूशिंग याच्या वतीने ॲड. सतीश वाणी यांनी बाजू मांडली.

माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याने न्यायालयासमोर वकील दाम्पत्याचे अपहरण कसे केले, यात कोणकोण सहभागी होते, कट कसा रचला याचा घटनाक्रम सांगितला. घटनाक्रम सांगत असतानाच ॲड. मनीषा आढाव यांचे हात बांधण्यासाठी वापरलेला गमछा त्याने ओळखला. माहिती देत असतानाच त्याला चक्कर आल्याने सुनावणी स्थगित करून त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सलग तीन दिवस ही सुनावणी होणार असल्याचे ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

दरम्यान, न्यायालयासमोर हर्षल ढोकणे याने सांगितले की, 24 जानेवारी रोजी किरण दुशींग, बबन मोरे, भैय्या खांदे, शुभम महाडीक यांनी हॉटेल रॉयल पॅलेस येथे एका वकिलाला उचलायचे व त्याच्याकडून 10 लाख रुपये घ्यायचे, नाही दिले तर त्याचा गेम करायचा असा कट रचला. मला पैशांची गरज असल्याने मीही त्यात सामील झालो. शुभम याने त्याच्या मित्राचा जामीन करायचा असल्याने पाथड न्यायालयात जायचे आहे, असे ॲड. आढाव यांना सांगितले होते.

त्यानुसार 25 जानेवारी रोजी आम्ही राहुरी न्यायालय येथे जाऊन ॲड. आढाव यांना किरण दुशींग याच्या गाडीत बरोबर घेतले. तेथून ब्राह्मणीजवळ माऊली हॉटेलच्या अलीकडे निर्जनस्थळी नेऊन त्यांचे हात बांधले. आम्ही पोलिस असून, तुमच्या मुलाने आळेफाटा येथून एका मुलीला पळवून आणले आहे, त्यासाठी आम्ही आलो आहोत, तुम्हाला मॅटर मिटवायचे असेल तर 10 लाख रुपये द्या, असे वकिलाला सांगितले.

त्यानंतर वकिलाला त्याच्या पत्नीला फोन करून मोहटादेवीला जायचे असे खोटे सांगायला लावले व त्यांच्या ओळखीच्या शुभम याला मनीषा यांना आणायला पाठवले. शुभम त्यांना घेऊन आल्यावर त्यांनाही गाडीत बसवले. तुमच्या घरी बसून चर्चा करू असे त्यांना सांगत आम्ही त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेलो, असे हर्षल ढोकणे याने न्यायालयात सांगितले.

दरम्यान, आरोपींना न्यायालयात आणल्यानंतर आरोपींनी कारागृह प्रशासनावर आरोप करत चार दिवसांपासून त्यांना उपाशी ठेवण्यात आल्याचे सांगितले. न्यायालयाने आरोपींना नाशिकहून घेऊन आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी आरोप फेटाळले. सकाळी सहा वाजता आम्ही त्यांना ताब्यात घेतले असून, रस्त्यात त्यांना चहा, बिस्कीट घेण्यास सांगितले होते, एकाने घेतले, बाकीच्यांनी नकार दिला असे सांगितले. न्यायालयाने आरोपींना भत्ता दिलाय का, याची विचारणा करत त्यांना भत्ता द्या, असे सांगितले.

ॲड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याने न्यायालयात सांगितलेल्या कबुली जबाबची माहिती दिली. त्याला चक्कर आल्याने उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे सोमवारी सुनावणी स्थगित करण्यात आली. तीन दिवस सुनावणी चालणार असल्याचे ॲड. निकम यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...

नगर शहरात 36 जागांवर ‌‘पे अँड पार्क‌’; पार्किंगसाठी दर काय? वाचा महत्वाची बातमी..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर शहरात वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करत...

महापालिकेची ‘ती’ योजना नगरकरांना लूटण्याचा डाव! बाजारपेठ, व्यापारी उध्वस्त…

किरण काळे | बाजारपेठ, व्यापारी उध्वस्त होतील, योजना मागे घेण्याची काँग्रेसची आयुक्त, आमदारांकडे मागणी अहिल्यानगर...