spot_img
ब्रेकिंगलॉरेन्स बिश्नोई टोळीने 'असा' रचला कट, करणी सेना प्रमुखाची दिवसाढवळ्या हत्या..

लॉरेन्स बिश्नोई टोळीने ‘असा’ रचला कट, करणी सेना प्रमुखाची दिवसाढवळ्या हत्या..

spot_img

नगर सहयाद्री / जयपूर

राष्ट्रीय करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या केल्याचे वृत्त आले आहे. राजस्थान जयपूरमध्ये श्याम नगरमध्ये ही घटना घडली. आरोपींनी सुखदेव सिंह यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकावरही गोळ्या झाडल्या आहेत. हत्येचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे.

त्यावेळी आरोपींनी सुखदेव यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये ते एका सोफ्यावर आरामात बसल्याचं दिसत आहे. याचवेळी तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवली आहे.

हल्लेखोरांपैकी एक नवीन सिंह शेखावत हा जयपूरच्या शाहपुरा येथील रहिवासी होता. तो एका कपड्याच्या दुकानात काम करायचा. क्रॉस फायरिंगमध्ये त्यांचा मृत्यू झाला.तर दोन हल्लेखोर स्कूटरवरून पळून गेले. हल्लेखोरांना गोगामेडी हे आधीपासून ओळखत असल्याचे बोलले जात आहे.

लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य रोहित गोदाराने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गोगामेडी यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रारही देण्यात आली होती. रोहित गोदरा हा दुबईत राहत असून तो लॉरेन्स गँगसाठी काम करतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनाने नगर तालुका पोरका झाला

खडकी येथे शोकसभेचे आयोजन । अनेकांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा अहिल्यानगर / नगर सह्याद्री -...

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...