spot_img
महाराष्ट्रस्वर्गीय वसंतदादांचे आमच्यावर राजकीय संस्कार: आ. काशिनाथ दाते

स्वर्गीय वसंतदादांचे आमच्यावर राजकीय संस्कार: आ. काशिनाथ दाते

spot_img

वासुंदे येथे जाहीर नागरी सत्कार
पारनेर
जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये काम करत असताना तालुक्यात अनेक विकास कामे मार्गी लावली व जनतेचे प्रश्न सोडवले त्यामुळेच जनतेमध्ये माझ्याविषयी सहानुभूती होती हे विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने मतदानातून दाखवून दिले हा सत्काराचा कार्यक्रम नसून आभाराचा कार्यक्रम आहे. यापुढे काळात तालुक्यात राजकारणापेक्षा समाजकारणावरच भर देणार आहे.

येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीच्या माध्यमातून लढवून त्या ताकदीनिशी जिंकणार आहे. सुजित झावरे पाटील यांनी मला आमदार करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे त्यांचे लवकरच पुनर्वसन करून त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करणार आहे.

वासुंदे व परिसरामध्ये विकास कामे करत असताना कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांचे आमच्यावर संस्कार असून त्यांचा तालुक्यातील संस्कारक्षम राजकारणाचा वारसा यापुढील काळातही आम्ही पुढे चालवणार आहे असे मत वासुंदे येथे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते सर यांनी व्यक्त केले.

पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते सर यांच्या भव्य नागरी सत्कार वासुंदे येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील व मान्यवर मंडळी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी स्व.मा. आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या मूर्तीच पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमसाठी वसंतराव चेडे, राजेंद्र उबाळे, अरुणराव ठाणगे, बाबासाहेब खिलारी, विक्रम कळमकर, सागर मैड, संतोष गायकवाड, अमोल साळवे, पै. दत्ता जगदाळे, किसन धुमाळ, विकास रोकडे, निजाम पटेल, रणजित पाटील, शरद पाटील, खेमनर पाटील, भाऊसाहेब सैद, दिलिप पाटोळे, सरपंच झावरे, उपसरपंच शंकर बर्वे, चेअरमन नारायण झावरे, जालिंदर वाबळे, व्हा चेअरमन रामचंद्र झावरे, विलास साठे सर, बाळासाहेब झावरे, बाळासाहेब शिंदे, मारुती उगले, लहानभाऊ झावरे, लक्ष्मण झावरे, खंडू टोपले, सगाजी दाते, किरण पोपळघट मन्सूर भाई पटेल, स्वप्नील झावरे, पोपटराव झावरे, महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तांबडीकार प्रकल्पाच्या प्रश्नाला प्राधान्य द्या
नवनिर्वाचित आमदार काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक विकास कामे मार्गी लागणार आहेत. पारनेर तालुक्याच्या उत्तर भागाला वरदान ठरणारा तांबडी कार प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागावा हा प्रश्न मार्गी लागल्यास खऱ्या अर्थाने हा भाग सुजलम होणार आहे. दाते सर यांना आमदार करण्यासाठी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाने विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य दिले.
-सुजित झावरे पाटील (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार धस यांचे मंत्री मुंडेंवर गंभीर आरोप; मंत्री विखे पाटील म्हणाले, पुरावे असतील तर..

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - Radhakrishna Vikhe Patil : मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत आमदार सुरेश...

संतोष देशमुख प्रकरणात शरद पवारांनी उचलले मोठे पाऊल, केले असे…

मुंबई / नगर सह्याद्री - बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राजकीय वातावरणात एकच...

शेवटच्या टोकापर्यंत पाणी कसे मिळेल यासाठी नियोजन करा, मंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी व घोड कालवा सल्लागार समितीची बैठक...

आमदार शिवाजी कर्डिले यांचा नगर पंचायत समितीवर डोळा; पहा पडद्याआड काय घडतंय…

नगर तालुका महाविकास आघाडीतील नाराजी भाजपाच्या पथ्यावर | ...तर भाजपा स्वबळावर सुनील चोभे | नगर...