spot_img
अहमदनगरस्व. बाबासाहेब कवाद यांची माणूसकीची भावना सर्वांनी जपण्याची गरज: आ. काशिनाथ दाते

स्व. बाबासाहेब कवाद यांची माणूसकीची भावना सर्वांनी जपण्याची गरज: आ. काशिनाथ दाते

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
बाबासाहेब कवाद यांची माणूसकीची भावना सर्वांनी जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. काशिनाथ दाते यांनी केले. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्व. बाबासाहेब कवाद यांनी मला विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी अनेकदा पक्षश्रेष्ठींकडे शिफारस केली होती. मी आमदार व्हावा अशी भावना स्व.कवाद यांच्या मनात होती. माता मळगंगा देवीच्या आशीर्वादाने आमदार होणायचे स्वप्न पुर्ण झाल्याची भावना आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केली.

रविवार दि.८ मार्च रोजी शरदचंद्रजी पवार अभ्यासिकेच्या सभागृहात मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या वतीने आमदार काशिनाथ दाते यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. खासदार नीलेश लंके यांच्या होमग्रांउंडवर आमदार दाते यांची सकारात्मक शब्दशैलीची बॅटिंग तुफान सुरू होती. अर्धा तास झालेले हे भाषन कधी शाब्दिक कोट करीत कधी खासदार नीलेश लंके यांना डिवचीत लंके यांच्या कार्यकर्त्यांची जनतेच्या मनात काय पेरले आणी जनतेने मात्र आम्हाला काय दिले याची जाणीव करुन देणारे होते.

२००४ ची विधानसभा निवडणुक माजी आमदार वसंतराव झावरे यांच्या बरोबर झालेले मतभेद आणी विजय औटी यांना आमदार करण्यासाठी बाबासाहेब कवाद यांनी दिलेला शब्द त्यांनी तीनही पंचवार्षिक मध्ये पाळला. माणूसकीची भावना आणी समाजाचे हित पाहणारे कवाद आपल्यात नाहीत मात्र त्यांनी दिलेली माणूसकीची शिकवण ही आपच कधीही विसरुन चालणार नाही.असे सांगितले.

यावेळी मळगंगा ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर यांनी प्रास्ताविक भाषनात आमदार दाते सर यांची माहिती देत अनुभवी नेतृत्वामुळे मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल अशी खात्री व्यक्त केली. यावेळी मळगंगा ट्रस्टचे उपकार्याध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, माजी सरपंच ठकारामशेठ लंके, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत लामखडे, माजी चेअरमन रामदास वरखडे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष व मळगंगा कंट्रक्शनचे अध्यक्ष अमृताशेठ रसाळ, सचिव शांताराम कळसकर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा सुधामती कवाद, संपदा सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी वराळ, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. बाळासाहेब लामखडे, युवा नेते रमेश वरखडे, ट्रस्ट विश्वस्त अनिल शेटे, रोहिदास लामखडे, विठ्ठलराव कवाद, संतोषशेठ रसाळ, ॲड . ज्ञानेश्वर लामखडे, बबनराव ससाणे, ग्रामपंचायत सदस्य व विश्वस्त मंगेश वराळ, विश्वस्त व ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या आशाताई वरखडे, बाबासाहेब कवाद, दत्तात्रय लंके, सल्लागार रुपेश ढवण, निघोज सोसायटीचे उपाध्यक्ष संतोष लामखडे, राजूभाऊ लाळगे, मोहन खराडे, वाय एम वराळ,वसंत ढवण, पोपट पांढरकर, पोपटराव लंके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पतसंस्था चळवळ ग्रामीण विकासाचा पाया
सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करत पतसंस्था चळवळीत काम करणाऱ्या लोकांना वेठीस धरण्याचे काम पाच वर्षात झाले. निवडणूक कार्यकाळात विरोधकांनी रडीचा डाव खेळत पारनेर ग्रामीण पतसंस्थेत ठेवीदारांना अडचण या खोट्या नाट्या बातम्या दाखवत पतसंस्था चळवळीला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. परंतु पतसंस्था चळवळीचे योगदान ग्रामीण विकासासाठी महत्वपूर्ण असून संस्था चालकांनी पारदर्शक कारभार करीत व सहकार चळवळ ही जनतेसाठी असल्याची स्व.कवाद यांची भावना लक्षात घेऊन कार्यरत राहावे असे आवाहन आ. काशिनाथ दाते यांनी केले.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे पाठबळ
केंद्र सरकार व राज्य सरकार महायुतीचे असल्याने तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आपल्याला पाठबळ अ आहे. तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू असून जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुकडी डावा कालवा अस्तारीकरण करण्यासाठी ८० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच तालुक्यातील बहुतांश भागाला कुकडीचे पाणी मिळण्यासाठी विखे पाटील यांचे मोठे सहकार्य मिळणार असून येत्या पाच वर्षांत राज्य सरकारकडून मोठा निधी उपलब्ध होणार आहे. जगप्रसिद्ध रांजणखळगे हा राज्याचा अनमोल ठेवा असून त्यांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही आ. काशिनाथ दाते त्यांनी दिली.

आम्ही तुमच्याबरोबर: वसंत कवाद
विधानसभा निवडणुकीत जरी आम्ही तुमच्या विरोधात काम केले असले तरी आज मात्र आम्ही तुमच्या बरोबर आहोत अशी खात्री देत मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपकार्याध्यक्ष वसंत कवाद यांनी आमदार काशिनाथ दाते यांचा स्वभाव व काम करण्याची पद्धत तसेच त्यांनी मोठ्या मनाने सत्कार स्विकारल्याबद्दल समाधान व्यक्त करीत धन्यवाद व्यक्त केले. निघोज गाव हे एक समृद्ध शहर होण्यासाठी पुणे येथील नामांकित कंपनीकडून विकासाचा आराखडा तयार करून घेतला असून यासाठी २५० कोटी रुपये तरतूद करावी लागणार असून केंद्र सरकार व राज्य सरकार माध्यमातून आमदार काशिनाथ दाते सर यासाठी निश्चित प्रयत्न करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

बाबासाहेब कवाद आमचे कुटुंबप्रमुख
बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कवाद आमचे कुटुंबप्रमुख होते. त्याच्या विचारसरणीचे आम्ही पाईक आहोंत. विधानसभा निवडणुकीत मी व माझ्या शेकडो महिला सहकाऱ्यांनी पाच दिवस आमदार काशिनाथ दाते यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला. यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे आहोत असा पाठींबा दिला. दाते सर यांच्या सारखे सहकारी पतसंस्थेचे नेतृत्व करणारे आमदार झाल्याने पतसंस्था चळवळ बळकट होईल.
– सुधामती कवाद, महिला जिल्हा कार्याध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एक कोटींची खंडणी अन् जीवे मारण्याची धमकी; कुठे घडला प्रकार पहा

बीड / नगर सह्याद्री : बीडमध्ये ढाकणे कुटुंबातील पिता पुत्रावर झालेल्या मारहाणप्रकरणी सतीश भोसलेवर...

उद्धवजी, तुमच्या हिंदुत्वाला उपनेत्यानेच छेद दिलाय!

संजय राऊतांचा पठ्ठ्या शिवसेना उपनेता साजन पाचपुते निघाला गोवंशाची कत्तल करणाऱ्या गँगचा म्होरक्या! सारिपाट /...

‘स्थानिक स्वराज्य संस्था मविआच्या ताब्यात येणार’

पारनेर | नगर सह्याद्री:- आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता...

भारत पुन्हा चॅम्पियन; 12 वर्षांनंतर रचला इतिहास!

नवी दिल्ली | वृत्तसंस्था चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत...