spot_img
ब्रेकिंगसुपा अतिक्रमण धारकांना शेवटचा 'अल्टिमेटम'

सुपा अतिक्रमण धारकांना शेवटचा ‘अल्टिमेटम’

spot_img

सुपा । नगर सह्याद्री
नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील सुपा येथील गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या अतिक्रमणा विरोधात शनिवार दि.२५ रोजी कारवाई करत सुमारे १५० हून अधिक अतिक्रमण भुईसपाट केले. यात काही अतिक्रमण धारकांनी आम्हाला वेळ द्यावा आम्ही स्वतः हून अतिक्रमणे काढून घेतो अशी विनंती केल्यानंतर प्रशासनाने त्यांना ३० मे पर्यंत अखेरची मुदत दिली असून त्यांनी जर अतिक्रमण काढले नाही तर कारवाईला सामोरे जावे लागेल यात शंका नाही.

बांधकाम विभाग व चेतक एंटरप्रायजेस यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या या कारवाईत टपरीधारकांची एकच धांदल उडाली. सुपा शहरात आत्तापर्यंत अतिक्रमण धारकांविरोधात झालेली ही सर्वात मोठी कारवाई ठरली. सुपा बसस्थानक ते एमआयडीसी चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. याठिकाणी फळांची दुकाने, चहा सेंटर, चपलांची दुकाने, कपड्यांची दुकाने, मटन शॉप, पानटपरी, स्टेशनरी यासह विविध प्रकारच्या दुकान चालकांनी अतिक्रमण केले होते. वस्तू खरेदी करताना रस्त्यावर गाड्या लावल्या जात असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे. बुधवारी बाजारच्या दिवशी नागरिकांना तासंतास रस्त्यावर अडकून बसावे लागत होते.

शनिवार मात्र सुपा पारनेर रस्त्यावरील अतिक्रमणे व नगर-पुणे महामार्गावरील अतिक्रमणे काही प्रमाणात काढण्यात आली असून सुपा चौक ते मुंजबा हॉटेल व सुपा चौक ते एमआयडीसी चौकापर्यंत उर्वरित अतिक्रमणे काढण्यासाठी ३० मे शेवटचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. दरम्यान सुपा बसस्थानक चौक ते एमआयडीसी चौकापर्यंत अतिक्रमणे काढण्याबाबत प्रशासनाकडून जितकी तत्परता दाखविण्यात आली तितकीच सुपा चौक ते म्हसणे फाटा, म्हसणे फाटा ते नारायणगव्हाण ही अतिक्रमणे काढण्याबाबत प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नारायणगव्हाण येथील अतिक्रमणे काढा
नगर- पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण येथील अतिक्रमणे यात कळीचा मुद्दा ठरणार आहे. चेतक एंटरप्रायजेसच्या वतीने सुमारे १२ ते १३ वर्षांपूर्वी महामार्गाचे काम केले. यादरम्यान नारायणगव्हाण येथील रस्ता अरुंद ठेवण्यात आला. वळण व अरूंद रस्त्यामुळे याठिकाणी अनेक अपघात झाले. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक प्रवाशांना कायमचे अपंगत्व आले. हा रस्ता चौपदरी व्हावा यासाठी नारायणगव्हाण ग्रामस्थांसह विविध संघटनांनी रास्ता रोको, उपोषण, टोलनाका बंद आंदोलन केले. परंतु हा रस्ता आजही वादात आहे. हेही अतिक्रमण काढावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...