spot_img
अहमदनगरपालकमंत्री विखेंचे लंकेंबद्दल सुचक विधान, पवारांचा देखील घेतला समाचार

पालकमंत्री विखेंचे लंकेंबद्दल सुचक विधान, पवारांचा देखील घेतला समाचार

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आज निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार सुजय विखे यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या निलेश लंके यांचे आव्हान आहे. प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत होत्या. मतदानाच्या दिवशीही हा राजकीय कलगीतुरा सुरू असून सुजय विखे यांचे वडील आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
.
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ आहे. जे दाखवलं जात होतं, ते वास्तव नाही. खरं वास्तव जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं नेतृत्व आमच्या पाठीशी आहे, आमचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. मात्र असं असली तरी निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने लढवावी लागते. सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सोशल मीडियातून एक वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न झालाफ परंतु आता खरा चेहरा लोकांसमोर आला आहे, असा घणाघातराधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, लंके यांच्यावर टीका करताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लक्ष्य केलें. लंके यांचा चेहरा हा झुंडशाहीचा, गुंडशाहीचा, हप्तेखोरीचा आहे. शरद पवार यांनीही असेच लोक आयुष्यभर सांभाळले आहेत. जनतेचा विश्वाघात करून त्यांनी कायम सत्तास्थानं मिळवली आहेत असे विखे यांनी म्हटले.

दरम्यान, विरोधी उमेदवाराला स्वत:बद्दल सांगण्यासारखं काहीही राहिलं नाही. त्यामुळे आमची बदनामी केली जात आहे. आपली गुंडगिरी, हप्तेखोरी, परप्रांतीयांना एमआयडीसीमध्ये नोकरीत प्राधान्य, हे सगळं पाप झाकण्यासाठी त्यांच्याकडून आमच्यावर पैसे वाटल्याचे आरोप केले जात आहेत, असा पलटवारही राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंतप्रधान मोदी पोहचले थेट आदमपूर एयरबेसवर; जवानांसोबत साधला संवाद

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला मोठा धडा शिकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र...

साईभक्तांसाठी खुशखबर! शिर्डीत ‘डोनेशन पॉलिसी’; काय-काय सुविधा मिळणार?

शिर्डी । नगर सहयाद्री शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देणगीदार भाविकांसाठी नवीन ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली...

पश्चिम देवस्थान समितीचा मोठा निर्णय; अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात ‘या’ ड्रेस कोडला बंदी

कोल्हापूर / नगर सह्याद्री : कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू...

निष्ठावंतांना पुन्हा मिळाली संधी! भाजपच्या जिल्हा अध्यक्षपदी दिलीप भालसिंग

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष पदाची...