spot_img
ब्रेकिंगLadki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी शेवटची संधी, आज अर्ज भरल्यास...?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी शेवटची संधी, आज अर्ज भरल्यास…?

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी ३१ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख आहे. या योजनेचे उद्दिष्ट राज्यातील पात्र महिला आणि मुलींना १५०० रुपये मासिक सहाय्य प्रदान करणं हे आहे.

२.५ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील २१ ते ६५ या वयोगटातील महिला आणि मुली या योजनेसाठी पात्र असून त्यांना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. या अंतर्गत त्यांना १५०० रुपये मासिक मदत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्र देणं आवश्यक आहे. आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक अकाऊंट डिटेल्स, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, जन्म दाखला, मतदान कार्ड हे कागदपत्र आवश्यक आहेत.

पात्र अर्जदार नियुक्त केंद्रांवर ऑफलाइन नोंदणी करू शकतात. आंगणवाडी, सेतू सुविधा केंद्र, ग्राम सेवक, आशा सेवक, वॉर्ड ऑफिसर अशा ठिकाणी ऑफलाईन अर्ज करता येईल. तसंच प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरवरुन नारी शक्ती दूत अॅप डाऊनलोड करुन ऑनलाईन ॲपद्वारे अर्ज करू शकता.

तीन महिन्यांचे पैसे एकत्र येणार
ज्या महिला, मुलींनी अद्यापही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नाही, ते ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे ४५०० रुपये एकत्र मिळतील. तसंच महिलांना त्यांचं बँक अकाऊंट आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. आधार कार्डशी लिंक असलेल्या अकाऊंटमध्येच पैसे जमा होतील. १४ ऑगस्टपासून या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.
लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत, महिलांची अजित पवारांकडे धाव

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं, की पुढील पाच वर्षांसाठी सरकार ९० हजार रुपये देईल. तर देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलं, की लाडकी बहीण योजनेसाठी मार्च २०२५ पर्यंत तरतूद करण्यात आली आहे. तसंच दरवर्षी अर्थसंकल्पातही ही तरतूद केली जाईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार! ‘जीवनसाथी डॉट कॉम’ बनावट आयडी, पुढे घडलं असं काही..

मुंबई । नगर सहयाद्री:- हनी ट्रॅपचा वापर करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाइटवरून महिलांना...

महायुती सरकारचा धडाकेबाज निर्णय; गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवणार

मुंबई। नगर सहयाद्री:- महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले आहे. साच एक...

लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! २१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

आयुक्त साहेब, चमकोगिरी नको फिल्डवर काम दाखवा; कोतकर काय म्हणाले पहा…

मनोज कोतकर | मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट | आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर शहरात भटया...