spot_img
अहमदनगरकुंभमेळा; मौनी अमावास्येसाठी ४०० विशेष रेल्वे; शाह, योगी आदित्यनाथ यांची भेट

कुंभमेळा; मौनी अमावास्येसाठी ४०० विशेष रेल्वे; शाह, योगी आदित्यनाथ यांची भेट

spot_img

कैलास ढोले | नगर सह्याद्री:-
जगातील सर्वात मोठा समजल्या जाणार्‍या प्रयागराज कुंभमेळ्यासाठी दिवसेंदिवस गर्दी होत असून येणार्‍या २९ जानेवारीला होणार्‍या विशेष मौनी अमावस्या महास्नानासाठी उत्तरप्रदेश सरकार व जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागाच्यावतीने जोरदार नियोजन करण्यात आले आहे. सुमारे ४० कोटी भाविक येण्याची शयता आहे. या दिवशी सरकारकडून ४०० विशेष रेल्वे व ८ हजार बसेस सोडण्यात येणार असल्याचे सरकारीअ सूत्रांनी सांगितले. २९ जानेवारीला २४ तास १७० रेल्वे सोडल्या जाणार आहेत. खुस्रोबाग येथे सुमारे एक लाख भाविकांची व्यवस्था रेल्वेने केली आहे. या भाविकांना महा इस्कॉन तर्फे भोजन,जलाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

दरम्यान येथील सुमारे अडीच हजार एकरवर कुंभनगर वसले आहे. या नगरात हजारो मोठे तंबू, लहान तंबू यांची रेलचेल झाली असून लाखो संख्येने साधू, संन्यासी मुक्कामाला आले आहेत. या शिवाय रोज लाखोंच्या संख्येने भाविक भक्त संगमावर स्नानासाठी येत आहेत. महाकुंभ नगर येथे हिंदू एकतेला चालना  पान २ वरदेण्यासाठी मानवी शृंखलेचे आयोजन करण्यात आले. देशाची,धर्माची एकता निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आदी मान्यवरांनी कुंभमेळ्यास भेट देऊन पवित्र संगमावर स्नान केले.गेल्या रविवार व सोमवारीही गंगा, यमुना, सरस्वती नद्यांचा जिथे संगम होतो तेथे सुमारे साडेतीन कोटी भाविकांनी स्नान केले. १३ जानेवारीपासून आतापर्यंत सुमारे १५कोटी श्रद्धाळू भाविकांनी स्नान केले आहे.

२९ रोजी होणार्‍या महत्वाची मौनी अमावश्या स्नानासाठी जय्यत तयारी शासनाने केली आहे. परिसरातील भाविकांसाठी २८ ते ३० जानेवारी दरम्यान मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.कुंभमेळ्याच्या ठिकाणी शहा यांनी महाकुंभ हा एकतेचा आणि अखंडतेचा महापर्व आहे. देश अखंड राहण्याचा संदेश कुंभमेळा देत आहे,असे सांगितले. तर योगी आदित्यनाथ यांनी कुंभमेळ्यासाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. कसलीही कमतरता राहणार नाही असे सांगितले. शहा यांनी कुंभमेळ्यातील वरिष्ठ अधिकारी, प्रमुख संत यांचेशी चर्चा केली. शहा व योगी यांनी त्रिवेणी पूजा केली तसेच शहा यांनी अक्षय वडाची पुजाही केली. यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनीही स्नान केले. योगी जुना आखडाचे महामंडलेश्वर अवधेशानंद,श्री निरंजन पिठाधिश्वर कैलास गिरी आदी उपस्थित होते.

शहा यांनी शृंगेरी पिठाधिश्वर शंकराचार्य स्वामी विधूशेखर भारती व शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांचे आशीर्वाद घेतले. उत्तरप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही कुंभमेळ्यास भेट देऊन संगमावर स्नान केले. यावेळी त्यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वर सरस्वती यांचे आशीर्वाद घेतले. यादव म्हणाले, महाकुंभ म्हणजे पवित्र स्थळ आहे. मात्र कुंभाचे आयोजन करताना सत्ताधार्‍यांनी राजकारण करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.कुंभमेळ्यात हजारो व्यापारी,दुकाने यांची रेलचेल झाली आहे.गंगा किनारी सर्वत्र साधू, संतांची तंबू, राहुट्या दिसत आहेत. कुंभमेळ्यासाठी जगातून आणि देशाच्या विविध भागातून भाविक प्रयागराज येथे येत दाखल होत आहेत. त्यामुळे रेल्वेस्टेशन,बस स्टँड येथील वातावरण गजबजून गेले आहे. प्रयागराज विमानतळावर ही भाविकांची गर्दी आहे.याशिवाय खासगी वाहनांनी ही लोक येत आहेत.एकूणच प्रयागराज गजबजून गेले आहे.

प्रशासनाचे नियोजन
३७ हजार पोलिस बंदोबस्त असेल. १४०० होमगार्ड असतील,कुंभ मेळाव्यासाठी २७५० सिसी टीव्ही बसविण्यात आले आहेत. तीन जल पोलिस स्टेशन असतील तर १८ पोलिस कंट्रोलरूम असतील. ५० अग्निशामक वाहने आहेत तर आरोग्य सुविधे बरोबरच १५ हजार स्वच्छता कर्मचारी ठेवण्यात आले आहेत.

ममता कुलकर्णीचा संन्यास
प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने कुंभमेळ्यात संन्यास घेतला आहे. शुक्रवारी संगमा तट येथे किन्नर आखड्याच्या वतीने ममता हिला पट्टाभिषेक करण्यात येऊन महामंडलेश्वर ही पदवी देण्यात आली.आचार्य महामंडलेश्वर डॉ.लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ममता हिला श्रीयामयी ममता नंदगिरी असे नवे नाव प्रदान केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...