राळेगण थेरपाळ / नगर सह्याद्री
कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी असूनही उन्हाळ्यामुळे पिके जळू लागली आहेत.
सध्या कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कुकडी डावा कालवा शेजारील संपूर्ण वीज रोहित्रांचा विद्युत पुरवठा हा बंद करण्यात आला आहे. कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने, वीज पुरवठा बंद केल्याने पिके जळू लागली आहेत. पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.
कॅनॉल उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. जिल्हाधिकारी यांचा आदेश असल्याने चार तारखेपर्यंत विद्युत पुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता वाडेगव्हाण यांनी नगर सह्याद्रीशी बोलतांना दिली.