spot_img
अहमदनगरशहराच्या मध्यवर्ती भागात कोयता गँगचा कहर; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर हल्ला..

शहराच्या मध्यवर्ती भागात कोयता गँगचा कहर; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर हल्ला..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
एका २२ वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी रात्री भिस्तबाग पडक्या महालाजवळ घडली. या प्रकरणी बालाजी प्रकाश श्रीगादी (रा. लक्ष्मी टॉवर कॉलनी, तपोवन रोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेरॉन सुरेश पंडीत, अॅलेक्स उर्फ जॉय नितीन सोनवणे (दोघे रा. डॉन बॉस्को कॉलनी), धीरज उर्फ जॅकी जॉन आवारी (रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालाजी श्रीगादी हे आपल्या (एमएच १२ एमजी ०१२८) क्रमांकाच्या दुचाकीची सर्व्हिसिंग करून घरी परतत असताना, पाठीमागून आलेल्या चार जणांच्या गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यातील एकाने शिवीगाळ करत मारहाण केली. इतर तिघेही आले आणि त्यांनी रस्त्यावरचे दगडे मारली. यावेळी आरोपींपैकी एका युवकाने हातात असलेला लोखंडी कोयता दाखवत तुला मारून टाकूअशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी कोयत्यासारख्या धोकादायक हत्यारासह हल्ला केल्याने सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रस्थापितांनी धसका घेतलेले शिवाजीराव!

सारीपाट / शिवाजी शिर्के वसुबारसेच्या निमित्ताने सारेजण उत्साहात सकाळची आवराआवर करत असताना दूध उत्पादक...

कोल्हेवाडीत थरार! तरुणाने पेटवली कार; भांडण सोडवणे पडले महागात

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- भांडण सोडवण्याचा प्रयत्न एका महिलेला चांगलाच महागात पडला. नगर तालुक्यातील...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय रिझर्व बँकेने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना 4 ऑक्टोबर...

कालच भेटलो, जेवलो… गप्पा मारल्या, अजूनही विश्वास बसत नाही; आमदार कर्डिलेंच्या निधनावर सुजय विखेंची प्रतिक्रिया

आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे धक्का बसला ; डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली...