spot_img
अहमदनगरकोतवालीचा कारभारी पो.नि. संभाजी गायकवाड यांच्या हाती; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे...

कोतवालीचा कारभारी पो.नि. संभाजी गायकवाड यांच्या हाती; पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेश

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

शहरातील महत्त्वाचे असलेल्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदावर पोलीस निरीक्षक संभाजी अभिमन्यू गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रशासकीय कारणास्तव हा महत्त्वपूर्ण बदल केला असून, याबाबतचे आदेश गुरुवारी (दि. २५) जारी केले आहेत.

तीन दिवसापूर्वी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली होती. त्यामुळे कोतवाली पोलीस स्टेशनचा पदभार कोण स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष होते. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे नगर जिल्ह्यातील जामखेड आणि पारनेर पोलीस स्टेशनचा कारभार त्यांनी याआधी पाहिला होता.

पारनेरवरून त्यांनी पुणे जिल्ह्यात बदली झाल्यानंतर पुन्हा ते अहिल्यानगर जिल्ह्यात बदली होऊन आले होते. काही दिवसांपासून ते नियंत्रण कक्षात होते आता नव्याने त्यांची नियुक्ती कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जीएसटी सवलतीबद्दल पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा ठराव मनपाने करावा

शहर भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाची आयुक्तांकडे मागणी अहिल्यानगर | नगर सह्याद्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र...

शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत; डॉ. सुजय विखे पाटील

लोणी बुद्रुक, हणमंतगाव, पाथरे परिसरातील नुकसानीची डॉ. सुजय विखे यांच्याकडून पाहणी लोणी | नगर सह्याद्री जिल्ह्यात...

‘लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या व्यक्तीचा दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न’

बीड / नगर सह्याद्री - ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांचे निकटवर्तीय सहकारी पवन कंवर...

पूर परिस्थितीमुळे परीक्षा पुढे ढकलल्या, एमपीएससीच्या परीक्षा….

नागपूर: मराठवाडा परिसरात गेल्या काही दिवसांत आलेल्या पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे....