spot_img
ब्रेकिंगकोतकरांच्या गळ्यात शहर प्रमुख पदाची माळ?

कोतकरांच्या गळ्यात शहर प्रमुख पदाची माळ?

spot_img

वरिष्ठ स्तरावर हालचाली | युवा सेनेचे शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांचे पक्षासाठी योगदान
सुनिल चोभे | नगर सह्याद्री
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात ठाकरे सेनेला धक्क्‌‍यावर धक्के बसत आहेत. छत्रपती संभाजीनगर नंतर अहिल्यानगरमध्येही जवळपास 15 आजी-माजी नगरसेवकांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला. त्यात ठाकरे सेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केल्याने सध्या ठाकरे सेनेचे शहर प्रमुख पद रिक्त आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहर प्रमुख पदावर नियुक्तीबाबत वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरु झाल्या असून सध्या युवा सेनेचे शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांना शहर प्रमुखपदी बढती मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

तीन वर्षापूव शिवसेनेची दोन शकले झाली. अनेकांनी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तसेच नुकताच ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक संजय शेंडगे, बाळासाहेब बोराटे, संतोष गेणप्पा, गणेश कवडे, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, नगरसेविका मंगलाताई लोखंडे, दत्ता कावरे, संग्राम कोतकर, माजी नगरसेवक सुरेश तिवारी यांनी 30 जानेवारी रोजी मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे गटाला जयमहाराष्ट्र करत शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यामुळे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत बोटावर मोजण्याईतकेच पदाधिकारी उरले आहेत.

सध्या माजी महापौर भगवान फुलसौंदर, राज्य युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हा प्रमुख गिरीष जाधव, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रविंद्र वाकळे, नगरसेवक योगीराज गाडे, युवा सेना शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर हे ठाकरे सेनेत आहेत. परंतू, यातील काही पदाधिकारी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेनेत प्रवेश करु शकतात असे बोलले जाते.

दरम्यान गेल्या सहा वर्षापासून युवा सेनेच्या शहर प्रमुख पदाची जबाबदारी हर्षवर्धन कोतकर यांनी पार पाडली आहे. या काळात कोतकर यांनी अहिल्यानगर शहरासह ग्रामीण भागातही शाखा स्थापण केल्या आहेत. तसेच युवकांचे मोठे संघटन त्यांच्यासोबत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी हर्षवर्धन कोतकर यांनी मोठी जबाबदारी सांभाळली आहे. केडगावमध्ये शिवसेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी युवा सेना प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांचे मोठे योगदान आहे.

सातपुतेंपाठोपाठ कदम यांनीही धरली शिंदे सेनेची वाट…
सुमारे तीन वर्षापूव एकनाथ शिंदे 40 आमदारांना सोबत घेत शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेची दोन शकले तयारी झाली. नगरमध्ये नगरसेवक अनिल शिंदे, दिलीप सातपुते, सचिन जाधव, सुभाष लोंढे, संग्राम शेळके यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. तत्कालिन शहर प्रमुख सातपुतेंनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याने ठाकरे सेनेच्या शहर प्रमुख पदाची जबाबदारी पुन्हा संभाजी कदम यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. परंतू, सातपुते यांच्या पाठोपाठ आता ठाकरे सेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनीही शिंदे सेनेत नुकताच प्रवेश केल्याने पुन्हा ठोकरे सेनेचे शहर प्रमुखपद रिक्त झाले आहे. त्यामुळे हे पद पुन्हा एकदा केडगावकरांच्या वण लागणार असल्याचे बोलले जात आहे.

यांचाही होऊ शकतो शहर प्रमुखपदासाठी विचार…
शहर प्रमुख संभाजी कदम यांनी नुकताच शिंदे सेनेत प्रवेश केल्याने ठाकरे सेनेचे शहर प्रमुख पद रिक्त आहे. या रिक्त जागेवर नियुक्तीसाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. शहर प्रमुख पदासाठी माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, रविंद्र वाकळे, योगीराज गाडे, गिरीष जाधव, हर्षवर्धन कोतकर यांची नावे चर्चेत आहेत. फुलसौंदर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, ते उपजिल्हाप्रमुखपदी असून सेनेशी एकनिष्ठ आहेत. त्यांचाही विचार केला जाऊ शकतो. राठोड राज्य युवा सेनेचे सहसचिव आहेत. योगीराज गाडे यांचे वडील ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. वाकळे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. जाधव उपजिल्हाप्रमुख आहेत. तसेच कोतकर हे युवा सेनेचे शहर प्रमुख आहेत. शहर प्रमुखपदासाठीफुलसौंदर, जाधव, कोतकर यांच्या नावावर खल सुरु आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...