spot_img
अहमदनगरकोतकरांचं ठरलं! विधानसभेसाठी थोपटले दंड

कोतकरांचं ठरलं! विधानसभेसाठी थोपटले दंड

spot_img


अहमदनगर | नगर सह्याद्री –
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी दंड थोपटले असून निवडणूक लढवायचीच यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कोतकर यांच्या विधानसभा निवडणुकीतील एन्ट्रीमुळे नगरच्या राजकारणात ट्वीस्ट पहावयास मिळणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमधील इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपूवच माजी महापौर संदीप कोतकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीही चालविली होती. रविवारी (दि.6) केडगाव येथील निशा लॉन येथे कार्यकर्त्यांची विचार मंथन बैठक घेण्यात आली. बैठकीला मोठ्या संख्येने कोतकर समर्थक उपस्थित होते. या बैठकीत कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त करत शहर आणि केडगावच्या विकासासाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी निवडणूक लढवावीच असे सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या विचार मंथन बैठकीला उद्योजक सचिन कोतकर यांनी संबोधित केले. ते म्हणाले, गणपती मिरवणुकीत माजी महापौर संदीप कोतकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या स्पंदन प्रतिष्ठानच्या भव्य मिरवणुकीने आणि मिरवणुकीसाठी जमलेल्या जीवा भावाच्या कार्यकर्त्यांमुळे शहरातील अनेकांनी धसका घेतला आहे. शहरातील जनता कोतकर यांच्या पाठिशी आजही ठामपणे उभी आहे हे दाखवून दिले. माजी महापौर संदीप कोतकर, माजी उपमहापौर सुवर्णाताई कोतकर यांनी पदाचा उपयोग फक्त विकासकामे करण्यासाठीच केला. कोतकर परिवाराने केलेली कामे आजही शहरवासियांच्या लक्षात आहेत. त्यामुळे शहराचा विकास कोण करु शकतो तर ते फक्त कोतकरच करु शकतात यावर नागरिकांचा विश्वास आहे. माजी महापौर संदीप कोतकर यांनी शहर विकासाचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या. लवकरच शहरात भव्य मेळावा आयोजित केला जाणार असल्याची माहिती सचिन कोतकर यांनी दिली.

संदीप कोतकर की सुवर्णा कोतकर
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी महापौर संदीप कोतकर यांनी दंड थोपटले आहेत. उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे कोतकर यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे ठाकरे की पवार गटाकडून उमेदवारी मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये माजी महापौर संदीप कोतकर की माजी उपमहापौर सुवर्णाताई कोतकर लढतात हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

माजी महापौर संदीप कोतकर यांची काय होती पोस्ट…
माझ्या प्रिय
नगरकरांनो,
नमस्कार…
गेली अनेक दिवसांपासून मी माझ्या व्ययक्तिक अडचणींमुळे आपल्याशी हितगूज करू शकलो नाही. परंतू आता वेळ आलीय बोलायची… म्हणून आपल्याशी हितगूज करतोय… नगर शहर विकसित व्हावं, शहराचे रुपडे बदलावे हे स्वप्न मी पाहिलं. महापौर पदाच्या काळात केडगाववासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न, केडगाव पाणी पुरवठा योजना, शहर पाणी योजना, शहरातील रस्ते, आरोग्य सेवा आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आपल्या पाठबळामुळे काही प्रमाणात का होईना यश आले. याचे साक्षीदार तुम्ही आहातच. अजूनही नगर शहरात विकासाची कामे करण्याजोगे खूप काही आहे. तरुणांच्या हाताला रोजगार, महिलांची सुरक्षितता, शिक्षणासाठी सोयी सुविधा, पाणी, आरोग्य, उच्च शिक्षण, एमआयडीसी उद्योगधंदे यावर काम करणं मला आवश्यक वाटतं. नगर शहर विकसित व्हावं यासाठी मनापासून खूणगाठ बांधलीय. पण नगर शहराच्या बाबतीत पाहिलेलं स्वप्न काहीस मागे पडलंय. आपल्याशी हितगूज करतांना मनाला खूप वेदना होतायेत. पण आपल्या नगर शहराला पुणे, नाशिकच्या बरोबरीने का होईना न्यायचेय. ही मनोमन इच्छा आहेच.
महापौर पदाच्या काळात शहराच्या विकासासाठी नगरकरांनो आपण मला लाख मोलाची साथ दिली. तुम्ही दिलेली साथ माझ्या आयुष्यात विसरणं कदापीही शक्य नाही. नगरकरांशी जोडलेली माझी नाळ आजही कायम आहे. त्यात थोडासाही बदल झालेला नाही. आणि होणारही नाही. गणपती विसर्जनाच्या वेळी माझ्या एका आवाहनावर तूम्ही हजारोंच्या संख्येने स्पंदन प्रतिष्ठानच्या आयोजित गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. आणि गणपती बाप्पाच्या ऐतिहासिक मिरवणुकीचे साक्षीदार झालात. हीच गणपती विसर्जनाची भव्य मिरवणूक नगर शहराला वेगळी दिशा देणारी ठरणार आहे. माझ्यावर आपले असलेले अतूट प्रेम या मिरवणुकीतून दिसून आले. अन ह्दय भरुन आले. नगरकरांनो आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास हा कदापीही तूटू देणार नाही हा माझा तूम्हाला शब्द आहे.
कोणी पुढे जात असेल तर त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला जातो. तसाच काहीसा प्रयत्न माझ्या बाबतीतही केला जातोय… पण आता मी थांबणार नाही… मागे हटणार नाही…. नगरकरांना दिलेला शब्द…. शहर विकासाचं पाहिलेलं स्वप्न… पूर्ण करण्यासाठी श्वासात श्वास असेपर्यंत मागे हटणार नाही…

शहराच्या विकासावर आपण नंतर बोलूच….!

सत्य परेशान हो सकता है
लेकिन पराजित नही…

लवकरच भेटूयात…

आपला
संदीप कोतकर
माजी महापौर

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरच्या राजकारणात ट्विस्ट! साहेबांनी डाव टाकला? AB फॉर्म दिला..

 Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यातच...

नेवासा तालुक्यात खासगी ट्रॅव्हल्सला आग?; १५ प्रवासी करत होते प्रवास..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर-छ.संभाजीनगर महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.ही...

आजचे राशी भविष्य!; ‘या’ राशींतील व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर राहणार आनंद? मिळणार खुशखबर

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला...

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त

राणीताई निलेश लंके यांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादी पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर...