कोल्हापूर | नगर सह्याद्री
छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रशात कोरटकरला वैद्यकीय तपासणीनंतर आज कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयामध्ये सध्या दोन्ही बाजूने युक्तीवाद सुरू आहे. महिनाभरापासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर कोरटकला कोल्हापूरमध्ये आणण्यात आले.
न्यायालयाबाहेर शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कोणताही अनुच्चित प्रकार घडू नये यासाठी कोरटकरला मागच्या गेटमधून कोर्टात नेण्यात आले.असीम सरोदे इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या बाजूने कोर्टात युक्तीवाद करत होते.
मप्रशांत कोरटकरच्या आवाजाचा नमुना घ्यायचा आहे. कोर्टाला तशी ऑर्डर करावी लागते. आरोपीला 7 दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी असीम सरोदे यांनी केली. आरोपीने छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.