spot_img
अहमदनगरकोरठण यात्रोत्सवास सुरुवात; 'यांच्या' हस्ते झाली महापूजा

कोरठण यात्रोत्सवास सुरुवात; ‘यांच्या’ हस्ते झाली महापूजा

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
पिंपळगाव रोठा (ता.पारनेर) येथील राज्यस्तरीय ’ब’ वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्त कोरठण देवस्थान गडावर वार्षिक यात्रोत्सवास सोमवारपासून सुरवात झाली. जिल्ह्यातील मोठा यात्रोत्सव म्हणून याकडे पाहीले जाते. तीन दिवस चालणार्‍या या उत्सवाची देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाकडून तयारी पुर्ण झाली आहे.

सोमवार (ता.१३)रोजी पहाटे चार वाजता खंडोबा देवाला मंगलस्नान, पुजा, चांदीच्या सिंहासनाचे व चांदीच्या उत्सव मुर्तीचे अनावरण करण्यात आले. सकाळी सहा वाजता माजी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके, तहसीलदार  गायत्री सौंदाणे, यांच्या हस्ते अभिषेक महापूजा, महाआरती होऊन भाविकांना दर्शनासाठी मंदीर खुले केले. मंगळवार (ता.१४) रोजी सकाळपासून देवदर्शन सुरु राहील. खंडोबा पालखीचे नवीन शाही रथातुन गावातुन प्रस्थान होऊन खंडोबा मंदीराकडे आगमन होईल. दहा वाजता बैलगाडा घाटाचे खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते पुजन होईल. शर्यतीचे किरण शेलार यांच्या मानाच्या गाडाने सुरवात होईल. संगमनेर तालुयातील सावरगाव घुले येथुन आलेल्या खंडोबा मानाच्या पालखीची मिरवणूक व देवदर्शन कार्यक्रम होईल.सांयकाळी खंडोबा देवाचा पालखी छबिना मिरवणूक होईल.

बुधवार(ता.१५)रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. सकाळी आठ वाजता खंडोबा चांदीची पालखी आणि अळकुटी, बेल्हे, कांदळी वडगाव, माळवाडी, सावरगाव घुले, कासारे, कळस येथुन आलेल्या पालख्यांची भव्य मिरवणूक निघेल. दुपारी छबिना मंदीराच्या पाय-यावर येऊन पालख्यांच्या मिरवणूकीची सांगता होईल. दुपारी बेल्हा, ब्राह्मणवाडा या गावांच्या मानाच्या काठ्यांची मिरवणूक होईल अशी माहीती अध्यक्षा शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, सचिव चंद्रभान ठुबे, राजेंद्र चौधरी, पांडुरंग गायकवाड, तुकाराम जगताप, जालिंदर खोसे, सुवर्णा घाडगे, रामदास मुळे यांनी सांगितले.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वारकरी दाम्पत्यावर काळाचा घाला; टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

श्रीगोंदा । नगर सहयाद्री पंढरपूरची वारी करून घरी परतत असताना येळपणे (ता. श्रीगोंदा) येथील...

नगरमध्ये गुटख्याची वाहतूक करणारी टोळी पकडली!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- गुटख्याची वाहतूक करणार्‍या टोळीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष...

वारकऱ्याला काठीने मारहाण; पंढरीत नेमकं काय घडलं?

Maharashtra News: आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांमध्ये आज सकाळी मोठी खळबळ उडाली, जेव्हा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जातकांना संकटांचा सामना करावा लागणार?

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...