spot_img
अहमदनगरनाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुक: कुणाचं पारडं जड ठरणार? कोल्हे, कचरे यांच्या उमेदवारीने...

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुक: कुणाचं पारडं जड ठरणार? कोल्हे, कचरे यांच्या उमेदवारीने रंगत…

spot_img

डॉ. राजेंद्र विखेंची माघार | २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
नाशिक शिक्षक परिषदेच्या निवडणूकीचे वातावरण जोरदार तापले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपूत्र विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत निवडणूकीतील आव्हान कायम ठेवले. तर टिडीएफ कडून भाऊसाहेब कचरे यांनी निवडणुकीत रंगत आणली आहे.

दरम्यान विवेक कोल्हे यांच्याशी निगडीत असलेल्या संस्थांवर राज्यसरकारच्या विभागांनी छापेमारी केलीय त्यामुळे विवेक कोल्हे चांगलेच आक्रमक झाले. आमचा वारसा संघर्षाचा असल्याचे त्यांनी सांगितले.विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटांचे किशोर दराडे महायुतीकडून उमेदवारी करत आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटांकडून अ‍ॅड. संदीप गुळवे तर टिडीएफ कडून भाऊसाहेब कचरे , यांच्यासह २० उमेदवार निवडणूकीच्या मैदानात आहेत.
दरम्यान विवेक कोल्हे यांच्या संबधित असलेल्या संस्थांवर राज्य सरकारच्या काही विभागांनी छापेमारी केली.

दरम्यान अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर विवेक कोल्हे यांनी यावर भाष्य करीत मुख्यमंत्री शिंदे आणि उमेदवार दराडे यांना इशारा दिला आहे. निवडणुकीत माघार घ्यावी, यासाठीच हे दबावतंत्र असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सुरवातीच्या टप्प्यातच भाजप नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले. मधल्या काळात विवेक कोल्हे यांच्या विविध संस्थांवर छापेमारी झाल्याची चर्चा होती. हा दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत होते. आता कोल्हे यांनीच यावर थेट प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हे म्हणाले, आमच्याकडील सहकारी आणि शैक्षणिक संस्थेवर राज्य सरकारच्या शिक्षण विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापेमारी केली. तीन, सात आणि ११ जूनला विविध पथकांतील अधिकार्‍यांनी चौकशी केली. कागदपत्रांची पाहणी केली. या चौकशीत त्यांना काय आढळून आले, हे त्यांनाच माहिती. मात्र, यावरून स्पष्ट होते की मुख्यमंत्री हे आमदार किशोर दराडे यांच्यासारख्या प्रवृत्तींना बळ देत आहेत. कोपरगावमधील आमच्या परिवाराच्या विविध संस्थांवर अशी कारवाई प्रथमच झाली आहे. मी निवडणुकीत माघार घ्यावी, यासाठीच हे दबावतंत्र असल्याचे दिसून येत असल्याचे दिसते.

आमचा वारसा संघर्षाचा
सध्या आमचा काळ वाईट आहे, पण आमचा वारसा संघर्षाचा आहे. कोणा प्रवृत्तींना बळ देण्यासाठी आम्हाला त्रास देणार असाल तर लक्षात ठेवा संघर्षाचा वारसा घेऊन या प्रवृत्तींच्या विरोधात आम्ही शिक्षकांना बळ देऊ.
– विवेक कोल्हे (अपक्ष उमेदवार)

कचरेंच्या पाठिशी टिडीएफ, शिक्षकांची ताकद
विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये संगमनेरपाठोपाठ सर्वाधिक मतदार नगरमधील आहे. शिक्षकांच्या असणार्‍या माध्यमिक शिक्षक सोसायटीवर गेल्या १५ वर्षांपासून अधिक काळ भाऊसाहेब कचरे यांचे वर्चस्व आहे. शिक्षकांची मोठी ताकत त्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत कचरे यांनी मोठे आव्हान कायम ठेवले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...