spot_img
ब्रेकिंगसिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री :-
धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना साधारणतः बारा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून ते घरीच होते. पण, अखेर त्यांच्या जुहूतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

धर्मेंद्र यांच्या प्रकृती अस्वास्थापासूनच वेगवेगळ्या बातम्या माध्यमांमध्ये पसरत होत्या. अनेक अफवाही पसरलेल्या. अद्याप देओल कुटुंबीयांनी धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आलेत. तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे.

धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला. आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल की, त्यांचं खरं नाव केवल कृष्ण देओल होतं. पण, सिनेसृष्टीत त्यांची ओळख धर्मेंद्र अशीच होती. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात झालेला. धर्मेंद्र यांचं वडिलोपार्जित गाव लुधियानातील पखोवाल तहसीलमधील रायकोटजवळील डांगो आहे. धर्मेंद्र यांनी त्यांचं सुरुवातीचं आयुष्य सहनेवाल गावात घालवलं आणि लुधियानातील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलेलं. त्यांचे वडील गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...

जय-वीरूसारख्या जिवलग मित्रांनी टोकाचं पाऊल उचल! दोघांनीही केली आत्महत्या, शहरात खळबळ, कारण काय?

Crime News : सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. दक्षिण सोलापूर...

उपमुख्यमंत्री अजित दादांच्या शिलेदारांनी फोन फिरवला; मोठा प्रश्न सुटला? नागरिकांनी मानले आभार? शहरात कुणाच्या नावाची चर्चा…

Politics News : कोपरगाव मतदारसंघातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे...