spot_img
अहमदनगरशहा-विखेंच्या भेटीचे महत्व खा. लंकेंना काय समजणार...; जिल्हाध्यक्षांचा खासदारांना टोला...

शहा-विखेंच्या भेटीचे महत्व खा. लंकेंना काय समजणार…; जिल्हाध्यक्षांचा खासदारांना टोला…

spot_img

भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांचा खा. निलेश लंकेंना टोला
अहमदनगर / नगर सह्याद्री –
केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरात मध्ये अमूलचा ब्रॅन्ड निर्माण करून दूध व्यवसायला प्रोत्साहन दिले. दूधाच्या प्रश्नाबबात मंत्री विखे पाटील यांनी त्यांची घेतलेली भेट खा. लंकेना समजायला वेळ लागेल असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी लगावला.

दूध प्रश्नाच्या संदर्भात दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शहा यांच्या घेतलेल्या भेटीबाबत खा.निलेश लंके यांनी केलेल्या टिकेचा दिलीप भालसिंग यांनी चांगलाच समाचार घेतला. दूधाच्या प्रश्नाबबात कोणतीही माहीती नसलेले स्वयंघोषित नेते दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे भांडवल करून राजकारण करीत आहे. परंतू त्यांच्या नौटंकीला शेतकरी ओळखून असल्याने आजच्या आंदोलनचा फज्जा उडला असल्याची टिका भालसिंग यांनी केली.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांची ना. विखे पाटील यांनी दूधाच्या प्रश्नाबबात घेतलेली भेट खा.निलेश लंके यांना समजायला वेळ लागेल असा उपरोधिक टोला लगावून भालसिंग म्हणाले की केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सहकाराच्या माध्यमातून अमूलचा ब्रॅन्ड निर्माण करून दूध व्यवसायाला पाठबळ त्यामुळेच मंत्री विखे पाटील यांनी शहा यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण असताना या भेटीवर खा. निलेश लंके यांचे वक्तव्य अतिशय हास्यास्पद आणि किव करणारे असल्याचे म्हणाले.

दूधाच्या प्रश्नावरून संसद बंद पाडू म्हणणारे अधिवेशनात एक शब्दही काढू शकले नाही. यासाठी प्रश्नाचा अभ्यास असावा लागतो. राज्यातील महायुतीचे सरकार दूध उत्पादकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून मंत्री विखे पाटील यांनी त्यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे दूध उत्पादकांना ३० रुपये भाव आणि पाच रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापुर्वी भाजपाचे सरकार असताना सुध्दा अनुदान दिले गेले होते. पण आज दूध उत्पादक शेतकऱ्यांबद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवणाऱ्यांनी राज्यात त्यांचे आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना काय दिले असा सवाल भालसिंग यांनी उपस्थित केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...