उपसभापतीपदी किसन सुपेकर यांची निवड
दत्ता उनवणे। नगर सहयाद्री:-
पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जवळा येथील किसनराव रासकर तसेच उपसभापतीपदी पठारवाडी येथील किसन सुपेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बाजार समीतीवर खासदार नीलेश लंके यांची निर्विवाद वर्चस्व असून सभापती उपसभापती पदासाठी लंके समर्थक संचालकामध्ये स्पर्धा होती.
मात्र खासदार लंके सांगतील तोच पदाधिकारी हा फार्म्युला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी पंचायत समिती सदस्य किसनराव रासकर यांना सभापतीपदाची संधी तसेच शिवसेना उबाठा गटाचे नेते व पठारवाडी गावचे माजी सरपंच किसन रासकर यांना उपसभापतीपदाची संधी मिळाली आहे. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तथा बाजार समितीचे संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे बैठकीस अनुपस्थित होते.
नूतन सभापती रासकर यांच्या निवडीची सुचना सभापती बाबासाहेब तरटे यांंनी मांडली तसेच उपसभापती बापू शिर्के यांनी अनुमोदन दिले. सुपेकर यांच्या निवडीची सुचना संचालक अशोकराव कटारिया यांनी मांडली. संचालक व माजी सभापती गंगाराम बेलकर यांनी अनुमोदन दिले. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विकास जाधव, मुख्य लिपिक आर एस चाबुकस्वार तसेच बाजार समितीचे सचिव सुरेश आढाव यांनी काम पाहिले. यावेळी सभापती, उपसभापती यांचा संचालक मंडळ, निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.