spot_img
अहमदनगरराठोड यांच्या उपस्थितीत काळे यांचा अर्ज दाखल ; कार्यकर्त्यांनी घेतली निर्णायक भूमिका

राठोड यांच्या उपस्थितीत काळे यांचा अर्ज दाखल ; कार्यकर्त्यांनी घेतली निर्णायक भूमिका

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
सकाळपासून काँग्रेसच्या वर्तुळामध्ये मोठी खलबते झाली आहेत. सोमवारी दिवसभर देखील बैठकांचा सिलसिला सुरू होता. मात्र मंगळवार सकाळ पासून काळे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी एकत्र होत काळे यांना फॉर्म भरण्यासाठी आग्रह धरला. कोणत्या ही परिस्थितीत माघार घ्यायची नाही. ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडावी. अन्यथा आपण बंडखोरी करत उमेदवारी करावी, असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांनी धरला. कार्यकर्त्यांच्या आग्रहा नंतर नाईलाजास्तव अखेर काळे यांनी फॉर्म भरला. त्यामुळे महाविकास आघाडी मधून काँग्रेसची बंडखोरी पुढे आली आहे. काळे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. युवा सेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड हे देखील समवेत उपस्थित होते.

काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच किरण काळे यांच्या नावाशी साधर्म्य असणारा जामखेड येथील एका व्यक्तीचा किरण नामदेव काळे या नावाने विरोधकांनी निवडणूक अर्ज दाखल केला आहे. याबाबत ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे की, विरोधकांना माहिती आहे की काळे हे सक्षम विरोधक आहेत. त्यामुळे किरण काळे असं पूर्ण नाव असणाराच उमेदवार त्यांनी जामखेड वरून आयात केला आहे.

आजपर्यंत ज्या पद्धतीने किरण काळे यांनी शहरातल्या ताबेमारी, दहशत, गुंडाराज याला तीव्र विरोध करत शहरामध्ये काँग्रेसला सक्षम विरोधी पक्ष म्हणून उभं करत नागरिकांच्या प्रश्नांवर, विकासाच्या मुद्द्यावर तीव्र स्वरूपाचा आवाज उठवला आहे. यामुळे जन माणसांमध्ये काळे यांच्या उमेदवारीची मोठी मागणी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जागा मिळत नसेल तर बंडखोरी झालीच पाहिजे. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी फेरविचार करावा आणि ही जागा काँग्रेसला द्यावी, अशी मागणी माथाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास उबाळे यांनी केली आहे.

यावेळी अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, मागासवर्गीय काँग्रेस विभागाचे प्रदेश सरचिटणीस सुनील क्षेत्रे, सावेडी उपनगर विभागाचे अध्यक्ष अभिनय गायकवाड, शहर जिल्हा सचिव किशोर कोतकर, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, महिला उपाध्यक्ष शैलाताई लांडे, काँग्रेसच्या महिला ज्येष्ठ नेत्या जरीना पठाण, महिला ज्येष्ठ नेत्या तथा उपाध्यक्ष डॉ. जाहिदा शेख, अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, क्रीडा व युवक काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, कामगार आघाडीचे दीपक काकडे, शहर जिल्हा सचिव रोहिदास भालेराव, संपतराव बोरुडे, उमेशराव साठे, काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. सुजित क्षेत्रे, युवक सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष गौरव घोरपडे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, खलिमा शेख, दिव्यांग विभागाच्या शहर जिल्हाध्यक्ष मिनाज सय्यद,
देवराम शिंदे, पोपटराव लोंढे, जयराम आखाडे, बाबासाहेब वैरागर ,बाबासाहेब वैरागर, नानासाहेब दळवी, राजेंद्र तरटे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी, माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...