spot_img
अहमदनगरकिरण काळे यांचे आरोप बिनबुडाचे, निराधार; जैन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथ्था...

किरण काळे यांचे आरोप बिनबुडाचे, निराधार; जैन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सुभाष मुथ्था काय म्हणाले पहा

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

नगरमधील जैन मंदिर ट्रस्टची जागा हडपल्याचा उबाठाचे किरण काळे यांनी केलेला आरोप बिनबुडाचा, निराधार आणि खोटा असल्याची माहिती जैन मंदिर कापड बाजार अहिल्यानरगरचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी सांगितले. तसेच काळे यांनी केलेले सर्व आरोप मुथ्था यांनी फेटाळून लावले.

अध्यक्ष सुभाष मुथ्था म्हणाले की, सदर जागा मंगुबाई हिरालाल व्होरा यांनी जैन मंदिर ट्रस्टला बक्षिस दिली आहे. ही जागा भाडेकरुंसह दिलेली असून या जागेत कधीही साधु, भगवंतांचा वास्तव्य नव्हत. तेथे कधीही सतसंंग, व्याख्यान झालेले नाहीत. व्होरा यांनी जागा ट्रस्टला बक्षिस म्हणून दिल्यापासून सदर जागेचा टॅस ट्रस्ट महापालिकेला भरत आलेला आहे. सदर जागेतून कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याने सदरील जागा विकण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला होता. येणा-या पैसे इतर ठिकाणच्या मंदिराला देणगी स्वरुपात देण्याबाबतचा विचार झाला होता. तसेच जागा बक्षिस देणा-या मंगूबाई व्होरा यांचे नाव पैसे दाण देऊन त्याठिकाणी लावावे असे ठरले होते. याबाबत अंदाजे दोन वर्षांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये याबाबतची जागा विक्रीबाबतची जाहीर नोटीसही देण्यात आली होती. परंतू नोटीस दिल्यानंतर मंडळाच्या असे लक्षात आले की, सदर जागा विकता येणार नाही. त्यामुळे सदर जाहिर नोटीस स्थगित करुन जागेबाबत साठेखत, खरेदीखत किंवा इतर कुठलाही व्यवहार केलेला नाही. त्यामुळे जागा विक्री बाबत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे अर्जही दिलेला नाही व परवानगी मागितलेली नाही. असे सुभाष मुथ्था यांनी स्पष्ट केले.

पुणे येथील जागेशी नगरची तुलना होऊ शकत नाही
पुणे येथे एचएनडी होस्टेलची जागा आहे. त्या जागेत दिगंबर जैन मंदिर आहे. तसेच होस्टेल आहे. तेथील जागेचा खरेदी खताचा व्यवहार झाला होता. नगरमधील जागेची परिस्थिती वेगळी आहे. येथील जागेत कोणतेही मंदिर नाही, होस्टेल नाही. या जागेपासून कोणतेही उत्पन्न मिळत नाही. व कुठलाही साठेखत व खरेदीखतचा व्यवहार झालेला नाही. त्यामुळे पुणे येथील जागा व नगरमधील जागा याची तुलना होवू शकत नाही असे अध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी सांगितले.

आमदार जगताप यांच्यावर केलेले आरोप खोटे
नगरमधील जैन मंदिर ट्रस्टची जागा भाडेकरांच्या ताब्यात आहे. जैन मंदिर ट्रस्टची जागा आमदार संग्राम जगताप यांनी लाटली असल्याचा आरोप किरण काळे यांनी लावला आहे. तो आरोप जैन मंदिर ट्रस्ट कापड बाजार, अहिल्यानगरचे  अध्यक्ष सुभाष मुथा यांनी फेटाळून लावत जागा लाटल्याचा आरोप खोटा असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पारनेरमध्ये उलथापालथ; उपमुख्यमंत्री पारनेरमध्ये; कोण कोण करणार प्रवेश पहा

पदाधिकार्‍यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती | सुजित झावरे पाटील यांचा शिवसेत पक्षप्रवेश पारनेर / नगर...

अतिवृष्टीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा, कुठे केली पाहणी पहा

ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीचा घेतला सविस्तर आढावा अहिल्यानगर / नगर सह्याद्री जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या...

सोलर पॅनल बसवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना पावणेतीन लाखांचा गंडा;

माजी सैनिकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री 'प्रधानमंत्री सूर्य घर योजने'अंतर्गत सोलर पॅनल...

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी

नेवाशाच्या तरुणावर एट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ​लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील...