Pik Vima Scheme: १ रुपयांत पीकविमा ही योजना केंद्र सरकारने राबवली होती. या योजनेत शेतकऱ्यांना १ रुपयांत पीकविमा मिळतो. या योजनेत देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे. परंतु अनेक बोगस अर्ज आणि गैरव्यव्हार होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ओडिशा सरकारने ही योजना बंद केली आहे.
बोगस अर्ज आणि गैरव्यव्हारांमुळे १ रुपयांत पिकविमा योजना बंद करावी, अशी शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीने सरकारला केली आहे. दरम्यान, ओडिशा सरकारने ही योजना बंद केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. एक रुपयात पिकविमा योजनेता मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता.
ओडिशातदेखील या योजनेच्या नावाखाली भ्रष्टाचार झाला होता.त्याच पार्श्वभूमीवर ही योजना बंद केली होती. १ रुपयांत विमा मिळत असल्याने शेतकऱ्यांनी अनेक अर्ज भरले आहेत. त्यामुळेच गैरव्यव्हार झाला आहे. एका अर्जामागे १०० रुपये घ्यावेत, असंही कृषी समितीने सुचवले होते. त्यामुळे बनवाट अर्ज जास्त येणार नाही. याबाबत कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, खरीप २०२४ मध्ये ५ हजारांपेक्षा जास्त अर्ज बोगस होते.
एक रुपयात पीक विमा योजनेत प्रत्यक्ष शेतकऱ्याला माहिती न देता सामूहिक सेवा केंद्र चालक पीकविम्यासाठी अर्ज करतात. एक अर्ज करण्यासाठी एक रुपया असतो. परंतु एका अर्जामागे सामूहिक सेवा केंद्र चालकाला ४० रुपये मिळते.असे अनेक प्रकार समोर आले आहेत. अनेक बोगस अर्जदेखील बाद करण्यात आले आहेत. त्यामुळेच ही योजना बंद करण्यासाठी शिफारस केली आहे.