spot_img
ब्रेकिंगधक्कादायक प्रकार! सतर्कतेने अल्पवयीन मुलीची सुटका ; घडलं असं काही..

धक्कादायक प्रकार! सतर्कतेने अल्पवयीन मुलीची सुटका ; घडलं असं काही..

spot_img

निघोज । नगर सहयाद्री :-
शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील घरात एक चोवीस वर्षीय तरुण अल्पवयीन मुलीला घेवून एकांतात राहत असल्याचा धक्कादायक प्रकार शिवबा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे शनिवारी ( दि.१८) उघड झाला.याबाबत संघटनेने पोलिसांना कळवीताच त्यांना ताब्यात घेवून या अल्पवयीन मुलीची सुटका करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

गेल्या सहा दिवसांपासून कामाच्या बहाण्याने एक तरुण अल्पवयीन मुलीस घेऊन येथे राहत असल्याची अधिकृत माहिती शिवबा संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष तथा माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे आणि माऊली घोडे यांना समजल्यानंतर त्यांनी खात्री करून टाकळी हाजी पोलिसांना कळविले. पोलिसांनी याबाबत तात्काळ लक्ष घालून पोलीस हवालदार अनिल आगलावे यांनी तरुणास व अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंस्टाग्रामच्या माध्यमातून वाशिम येथील तरुण व मुंबईतील अल्पवयीन मुलीची लव्हस्टोरी सुरू झाल्याचे समजले. सदर तरुणाने या मुलीला मुंबईवरून येथे आणून ठेवल्याचे सांगितले.

हा प्रकार लवकर उघडकीस आला नसता, किंवा काही अनुचित प्रकार घडला असता तर मोठा अनर्थ झाला असता. मात्र शिवबा संघटनेच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीची सुटका झाल्याने या कार्याबद्दल शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांच्यासह टाकळी हाजी ग्रामस्थांनी सोमनाथ भाकरे आणि माऊली घोडे यांचे विशेष कौतुक केले. शेतातील किंवा व्यावसायिक कामासाठी बाहेरच्या व्यक्तींना आपल्या घरी किंवा खोलीमध्ये राहण्याची व्यवस्था करत असाल तर प्रथमतः त्यांचे आधार कार्ड , पत्ता, मोबाईल नंबर घेऊन खात्री करूनच आश्रय द्यावा. असे आवाहन शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आज मंत्री कोकाटेंचा सेंडऑफ? रोहित पवारांची बोचरी टीका

Rohit Pawar: सभागृहात कार्ड गेम खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या जोर...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कुठे घडली घटना?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील एका गावात दोन महिन्यांपूर्वी एका 11...

जुनी इच्छा पूर्ण होणार? कसा जाणार सर्वांचा दिवस?, वाचा आजचे भविष्य!

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. जर तुमची...

ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना महत्वाचे आदेश

वर्धा / नगर सह्याद्री - राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. सुरुवातीला जिल्हा...