अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील एका होस्टेल मध्ये शिकणाऱ्या दोन 14 वषय अल्पवयीन मुलींना अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात शुक्रवार (दि.17) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका होस्टेलमध्ये 14 वषय दोन अल्पवयीन मुली शिक्षण घेत होत्या. त्यापैकी एका मुलीचे पालक भेटण्यासाठी होस्टेल येथे आली होती. दरम्यान, दोन्ही मुलींनी पालकांना भूक लागली असल्याचे सांगितले. पालक त्यांना गेटच्या बाहेर उभे करून खायला आणायला गेली.
परत आले असता दोन्ही मुली मिळून आल्या नाही. दोघी मुलींचा आजुबाजुच्या परिसरात नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु कोठेही मिळुन आल्या नाही. मुलींचा पालकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.