spot_img
अहमदनगरयुवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा उद्योजकाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. याप्रकणी युवा उद्योजक महेश सुरेश गावडे यांचेफिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात निखिल राजकुमार लुन याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: युवा उद्योजक महेश गावडे यांची नगर एमआयडीसीत शिवशक्ती इंटरप्राईजेस कंपनी आहे. कंपनीच्या कामाकरता त्यांनी निखिल राजकुमार लून याच्या कडून 2021 मध्ये दहा लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात महेश गावडे यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या प्लॉटचे साठेखत करून दिले होते. त्यानंतर दोन वर्षात महेश गावडे यांनी संपूर्ण पैसे व्याजासह परत करून हा सर्व व्यवहार मिटून टाकला होता.

मात्र त्यानंतर निखिल लून याने त्याच्या नावावर साठेखत केलेला प्लॉटचा व्यवहार रद्द करण्यास टाळाटाळ करत असल्याने महेश गावडे यांनी याप्रकरणी कोर्टात दावा दाखल केला होता. मात्र तरीही निखिल लून हा वेळोवेळी महेश गावडे यांना दमदाटी करून प्लॉट माझ्या नावावर करून दे असे धमकावत होता.

संक्रांतीच्या दिवशी महेश गावडे आणि त्यांचे मित्र एमआयडीसी मध्ये कंपनीकडे जात असताना निखिल लून याने एका चार चाकीत येऊन महेश गावडे यांच्या दुचाकी गाडीला गाडी आडवी घालत खाली उतरून आजच्या आजच मला प्लॉटची खरेदी करून दे व माझ्या विरुद्ध कोर्टात व उपनिबंधक कार्यालयात दिलेली तक्रार मागे घे नाहीतर तुला आज जिवंत सोडणार नाही तुझा काटाच काढतो असे म्हणत लोखंडी रॉडने गावडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर निखिल लून याने महेश गावडे यांना स्वतःच्या चार चाकी गाडीत बळजबरीने बसवून घेऊन गेला त्यानंतर निखिल याने स्वतःच्या ऑफिसवर नेऊन महेश गावडे यांना लाथा मुक्याने मारहाण केली तिथे मारहाण केल्यानंतर माझा प्लॉट माझ्या नावावर करून दे अशी धमकी देऊन त्याने पुन्हा महेश गावडे यांना बळजबरीने दुसऱ्या एका पांढऱ्या गाडीत बसवले. खरेदीखत करून घेण्यासाठी गाडी उपनिबंधक कार्यालयाकडे घेऊन जात असताना मनमाड रोडवर हॉटेल चैतन्य क्लासिक जवळ गाडीचा वेग कमी झाल्याने महेश गावडे यांना त्यांचे मित्र रोड वरून जाताना दिसले.

त्यावेळी महेश गावडे यांनी मोठमोठ्याने आवाज देऊन त्यांच्या मित्रांना बोलवून घेतले त्या ठिकाणी गाडी हळू झाल्यामुळे महेश गावडे यांच्या मित्रांनी गाडीचा दरवाजा उघडला त्यावेळी महेश गावडे यांच्या पायातून रक्तस्त्राव होत होता. महेश गावडे यांच्या मित्रांनी आरडा ओरड केल्याने त्या ठिकाणी गर्दी जमा होऊ लागल्याने निखिल लून याने महेश गावडे यांना गाडीतून उतरून दिले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....