spot_img
अहमदनगरनगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

नगरमधून अपहरण, आळंदीत अत्याचार; वारकरी शिक्षण संस्थेत चाललंय काय? महिला कीर्तनकारासह..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
पुण्याच्या आळंदी येथे धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून अहिल्यानगर येथून एका युवतीचे अपहरण तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी 5 जनांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक या प्रकरणात एका महिला कीर्तनकाराचा सहभाग आहे.

2 जून 2025 रोजी पीडिता घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या एका महिलेने तिला शेताकडे जाण्याचे कारण सांगून घराबाहेर नेले. त्याचवेळी वाटेत काळ्या रंगाच्या इर्टिगा गाडीतून आलेल्या आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे आणि एका अनोळखी चालकाने तिचे जबरदस्तीने अपहरण केले. तिने आरडाओरड केली असता ॲसिड टाकण्याची धमकी देण्यात आली.

नंतर तिला आळंदी येथील खासगी मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत नेण्यात आले. तिथे आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, सुनिता आंधळे आणि अभिमन्यु आंधळे यांनी तिला खोलीत डांबून ठेवले. फिर्यादीनुसार, या ठिकाणी आण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. सुरुवातीला पीडित युवती घाबरल्यामुळे तक्रार दिली नाही.

पण तिने सर्व हकीकत घरच्यांना सांगितल्यानंतर (7 जुलै) या बाबत शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.या प्रकरणी पोलिसांनी आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रविण प्रल्हाद आंधळे, गाडीचा अनोळखी चालक, सुनिता अभिमन्यु आंधळे, अभिमन्यु भगवान आंधळे या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जैन मंदिर: काळे यांचे पुण्यात धरणे आंदोलन; ताबा न सोडल्यास प्राणांतिक उपोषण करणार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये श्री ऋषभ संभव जीन जैन श्वेतांबर संघ (जैन मंदिर) ट्रस्टचा...

बदनामी केली..; किरण काळे यांच्यावर कारवाई करा; पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना कोणी दिले निवेदन

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- श्री ऋषभ संभव जिन जैन श्वेतांबर संघाच्या कापड बाजार अहिल्यानगरच्या...

आघाडी, युतीचे चित्र धुसर…; स्थानिक आघाड्यांना प्राधान्य

नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी राजकारण तापले | वरिष्ठांकडून आदेश मिळेना अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अहिल्यानगर...

बोगस दस्त नोंदवून फसवणूक प्रकरण; अंजुम शेख, डावखर, इंगळेंसह सात जणांविरुध्द गुन्हा दाखल

श्रीरामपूर | नगर सह्याद्री वारसा हक्कातील जमिनीच्या वादातून श्रीरामपुरात कोट्यवधी रुपयांचा बोगस दस्त नोंदवून, फसवणूक...