spot_img
अहमदनगरखरीप हंगामातील पेरण्यांना वेग! नगर, श्रीगोंदा, पारनेरवर 'पावसाची कृपा'

खरीप हंगामातील पेरण्यांना वेग! नगर, श्रीगोंदा, पारनेरवर ‘पावसाची कृपा’

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
यंदा वरूण राजाने कृपा दाखवल्यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामाचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. १४ जूनअखेर नगर, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड आणि राहुरी तालुयात पावसाचे प्रमाण अधिक आहे. तर उत्तरेतील राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, अकोले येथे पावसाचे प्रमाण कमी आहे. दरम्यान, नगर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुयावर पावसाने कृपा दाखवत मुसळधार हजेरी लावली. अनेक ठिकाणी बंधारे, ओढे, नाले तुडूंब झाले आहेत.

यंदा गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. अनेक ठिकाणी काही तासात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येणार आहे. तर काही ठिकाणी पेरणीसाठी वापसा होण्यास पुढील काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

जिल्ह्यात दक्षिण विभागात यंदा पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. जिल्ह्यात १४ जून अखेर १२७.६ टक्के सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. यात २०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झालेल्या महसूल मंडलांची संख्या १५ असून यातील कर्जत तालुयातील राशिन मंडळात ३६२. ३ मि.मी. पावसाची आतापर्यंत नोंद झालेली आहे.

यात नगर तालुयात अनेक ठिकाणी धुव्वाँधार पाऊस झाला असून यामुळे ओढे, नाले तुंडूब भरलेले आहेत. या पावसामुळे खरीप हंगामासाठी पेरणी लायक पाऊस झाला असून येत्या काही दिवसात जिल्ह्यात पेरण्यांना सुरूवात होणार आहे.

बुधवारी झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये 
नालेगाव ३६, कोपूरवाडी ३५, भिंगार २५, नागापूर ४२, वाळकी ४५.५., रुईछत्रपती ४६.५, सुपा ३९, टाकळी २९, श्रीगोंदा ३४, काष्टी ४६, मांडवगण २६, बेलवंडी ३२, पेडगाव ४६, चिंभळा ३३, कोळगाव ३०, राशिन ५८, भांबोरा २८, नेवासा २१, सलाबतपूर २०.८, टाकळीमियॉ २१.३, पिंपरने ५५.५, श्रीरामपूर २१, बेलापूर ३६ मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.

दक्षिणेत कडधान्य वाढणार
नगर जिल्हा कडधान्य पिकवणारा भाग आहे. मान्सूनच्या सुरूवातीचा अथवा मान्सूनपूर्व पाऊस झाल्यास त्यावर कडधान्य पिकाचे भवितव्य अवलंबून राहते. यंदा दक्षिणेत पाऊस जोरात असल्याने कडधान्य पिकाचे क्षेत्र वाढणार आहे. विशेष करून पारनेर तालुयात वाटाणा पिकाचे क्षेत्र वाढणार असून तालुयातील ठरावीक गावात वाटाणा हे प्रमुख पीक असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...