spot_img
अहमदनगरखैरी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो; शेतकऱ्यांनी केला आनंद व्यक्त, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

खैरी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो; शेतकऱ्यांनी केला आनंद व्यक्त, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

spot_img

नगर सह्याद्री / नासीर पठाण
जामखेड – खर्डा येथील दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता खैरी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग मराठवाड्याकडे झेपायला आहे. या भागातील शेतीचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच नदीकाठच्या गावे, वस्त्या, तांडे तेथील शेतकरी व ग्रामस्थ यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

या क्षेत्रातील आपले प्राणी, पशुधन, मौल्यवान वस्तू, कृषी पंप, शेती अवजारे इत्यादी सुरक्षित जागी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे नदीपात्रातून ये जा करताना दक्षता घ्यावी असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

खैरी मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी 562.30 मीटर आहे एकूण साठा 533.60 द.श.घ फु.असून उपयुक्त साठा 485.22 द.श.घ.फु.सध्या उपयुक्त साठा 100 टक्के झाला आहे. मागील वर्षी पावसाने हात आकडता घेतल्याने खैरी प्रकल्पाचा उन्हाळ्यात मृतसाठा झाला होता. त्यामुळे उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला होता ऊस क्षेत्र घटले होते पुढील पावसाळ्यात खैरी प्रकल्प भरतो की नाही याची चिंता परिसरातील शेतकऱ्यांना लागली होती. परंतु खर्डा जवळील मोहरी तलाव पहिल्याच पावसात भरल्यामुळे व सांडव्याचा पाण्याचा विसर्ग दरवाडी येथील खर नदीद्वारे महिना भरापासून खैरी मध्यम प्रकल्पाकडे सुरू होता.

तसेच खर्डा येथील कौतुका नदीचे पाणीही खैरी प्रकल्पात जात होते,तसेच मोहरी भागाच्या घाटमाथ्यावर सतत मोठा पाऊस पडत राहिल्याने या दोन्ही नद्यांचा प्रवाह सुरू असल्याने अखेर या भागाला वरदान ठरणारा खैरी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला व सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग पुढे जात असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले असता यावेळी शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पेट्रोल पंपावर ऑनलाइन पेमेंट बंद! कारण काय?

मुंबई । नगर सहयाद्री:- डिजिटलच्या युगात सर्व ऑनलाइन झाले आहे. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने...

धनलक्ष्मीचा योग आला! ‘या’ राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य एकदा का हे प्रश्न सुटले की घरातील वातावरण...

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...