spot_img
अहमदनगरखडकी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; विद्यार्थ्यांचे 'मिशन आरंभ'मध्ये उतुंग यश

खडकी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; विद्यार्थ्यांचे ‘मिशन आरंभ’मध्ये उतुंग यश

spot_img

खडकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम
सुनील चोभे | नगर सह्याद्री
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून अहिल्यानगर जिल्हा परिषदेत गत वर्षापासून मिशन आरंभ ही स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे. यावर्षीही ही स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकीच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. यावर्षी 12 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

शाळा भौतिक सुविधांनी सुसज्ज असून यामध्ये ग्रामपंचायती अंतर्गत शाळेमध्ये सोलर सिस्टिम, शौचालय सुविधाही, पाण्याची 24 तास सुविधा, आर.ओ. सिस्टीम बसवण्यात आली आहे. मुख्य लेखा अधिकारी रमेश कासार यांच्या पुढाकाराने खडकी शाळेला 20 टॅब उपलब्ध झाले आहेत. ग्रामपंचायतीमार्फत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 120 विद्यार्थी या टॅबचा लाभ घेतात. जिल्हा परिषद शाळेच्या अंतर्गत गावामध्ये एक गाव एक शिवजयंती ही संकल्पना राबवली जात आहे. डॉक्टर सुजय विखे यांच्यामार्फत शाळेला 65 इंची इंटरॅक्टिव्ह बोर्ड उपलब्ध झाला असून त्यावर विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखविले जातात. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लोकसहभागामधून इन्व्हर्टर, प्रत्येक वर्गाला प्रिंटर उपलब्ध असून त्या प्रिंटचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी केला जातो. शाळेला सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. शाळा डबल आय एस ओ मानांकन मिळवलेली जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. शाळेमध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात पावणे दोन लाख इतकी रक्कम शाळा विकासासाठी पालकांनी उपलब्ध करून दिला आहे. चालू वर्षापासून इयत्ता पहिलीला सी बी एस सी अभ्यासक्रम चालू करण्यात येणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत झाला सत्कार
या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये श्रेयाली अनिल रोकडे, अविष्का चंद्रकांत कोठुळे, कल्याणी सुनील चोभे, श्री राज अमित तडके, दक्ष जालिंदर कोठुळे, आर्या मनेश भोसले, सोहम सुभाष शिंदे, सुयश अशोक रोकडे, ईश्वरी भाऊसाहेब रोकडे, आदित्य विनोद सूर्यवंशी, अनुष्का दीपक कोठुळे, दूर्वा संदीप कोठुळे यांचा समावेश आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामपंचायत खडकी, शाळा व्यवस्थापन समिती व सर्व पालकांनी बक्षीस देऊन केला. या यशामुळे शाळेचे व वर्गशिक्षकांचे कौतुक होत आहे. या कामी कर्तव्यदक्ष विस्ताराधिकारी निर्मलाताई साठे व आदर्श गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला; ८ जणांचा मृत्यू, कुठे घडली घटना?

Accident News: शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या अपघातामध्ये ८ जणांचा...

पावसाचा रेड अलर्ट! ‘या’ जिल्ह्यांना धोका

Rain update: एप्रिल महिना सुरू असूनही राज्यात उन्हाऐवजी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे....

सभापती राम शिंदे यांना धक्का!; ‘ते’ पद राष्ट्रवादीच्या ताब्यात

जामखेड । नगर सहयाद्री:- कवडगाव-गिरवली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये कर्जत जामखेडचे...

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

मुंबई । नगर सहयाद्री भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णअध्याय आज संपला आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि...