spot_img
अहमदनगर'दुध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मंत्री विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा'

‘दुध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मंत्री विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा’

spot_img

दूधदरासाठी शुक्रवारपासून राज्यभर आंदोलन
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
दुधाला किमान ३५ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दुध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. वर्षभर सातत्याने तोटा सहन करावा लागल्याने दुध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून राज्यात शेतकरी आंदोलन करु लागला आहे. सरकारने सर्व आंदोलनांची दखल घेत दुध उत्पादकांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावे अन्यथा येत्या २८ जून पासून राज्यात किसान सभा व समविचारी विविध शेतकरी संघटना, कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.डॉ. अजित नवले म्हणाले, गेले वर्षभर दुध दराबाबत शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. प्रति लिटर १० ते १५ रुपयांचा तोटा सहन करून दुध उत्पादक शेतकरी दुध घालत आहेत. राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान ३५ रुपये दर द्यावा, बंद केलेले दुध अनुदान पुन्हा सुरु करावे, वाढता उत्पादनखर्च व तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रति लिटर १० रुपये करावे तसेच अनुदान बंद काळात दुध घातलेल्या शेतकर्‍यांना या काळातील अनुदान द्यावे. दुधाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तत्कालीन उपाय योजनांच्या बरोबरच दीर्घकालीन दुध धोरण तयार करण्याची नितांत आवश्यकता आहे.

दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा यासाठी उसाप्रमाणे दुधालाही एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करावी, पशुखाद्य व पशु औषधांचे दर नियंत्रित करावेत, खाजगी व सहकारी दुध संघाना लागू होईल असा लुटमार विरोधी कायदा करावा. दुध भेसळ रोखावी, अनिष्ट ब्रँडवार रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरणाचा स्वीकार करावा, मिल्कोमीटर व वजन काट्यात होणारी दुध उत्पादकांची लुटमार थांबविण्यासाठी तालुका निहाय स्वतंत्र तपासणी निरीक्षकांची नियुक्ती करावी, शासकीय अनुदानातून पशु आरोग्य विमा योजना सुरु करावी या मागण्या संघर्ष समिती करत आहे. शासनाला दिलेल्या निवेदनावर डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, सतीश देशमुख, अशोकराव ढगे, जोतीराम जाधव, नंदू रोकडे, दादा गाढवे, राजकुमार झोरी, श्रीकांत कारे, रामनाथ वदक, दीपक वाळे, मंगेश कान्होरे, दीपक पानसरें, सुहास रंधे, अमोल गोर्डे, रवी हासे, दीपक काटे, केशव जंगले यांच्या स्वाक्ष-या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! फिर्यादीच निघाले आरोपी; विखेंचे बॅनर फाडणारे जेरबंद

शिर्डी । नगर सहयाद्री:- शहरातील लक्ष्मीनगर परिसरात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे...

२१ वर्षांच्या नर्तिकेच्या नादात ३५ वर्षांचा नेता संपला!, कारमध्ये आढळला मृतदेह? शहरात खळबळ..

Maharashtra Crime News: मगळवारी सकाळी एका तरुणाचा कारमध्ये मृतदेह आढळून आला, ज्यामुळे परिसरात खळबळ...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना खुशखबर! सरकार ऑगस्टचा हप्ता खटाखट जमा करणार, वाचा अपडेट..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक...

आजचे राशी भविष्य! अफाट धन-दौलत मिळणार! ‘या’ राशींच्या नशिबात राजयोग?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. तुमचे...