अहिल्यानगर | नगर सह्याद्री
केडगाव उपनगरातील एका परिसरात सामूहिक अत्याचार झाल्याचे वृत्त हाती आले आहे. मागील भांडणाच्या कारणावरून महिलेवर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. धक्कादायक म्हणजे अत्याचार करताना तीन ते चार जणांनी तिला मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
केडगाव उपनगरात एका परिसरात महिलेला मारहाण करत अत्याचार करण्यात आला. तीन ते चार आरोपींनी हे कृत्य केले. यात मागील भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडला. यात एका जणाने तिच्यावर अत्याचार केला तर तीन जणांनी तिला मारहाण केली.
या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. पीडितेस उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तिच्यावर उपचार सुरु असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
अहिल्यानगरात तरुणीचा विनयभंग
बोल्हेगाव येथे रस्त्यावर एका 16 वषय तरुणीचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी सुरज विधे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. गांधीनगर, बोल्हेगाव) याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. दिनांक 14 जुलै 2025 रोजी दुपारी 11:45 वाजेच्या सुमारास गांधीनगर येथील महादेव मंदिराजवळून विलिव्हियर्स चर्चसमोरून जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी सुरज विधे याने तरुणीचा रस्ता अडवला. त्याने तिचा हात पकडून तिला तू मला आवडतेस असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच, मोटारसायकलवरून तिचा पाठलाग केल्याचा आरोप आहे.या घटनेची तक्रार तोफखाना पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपासासाठी प्रमीला गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक आनंद कोकरे आणि पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.