spot_img
ब्रेकिंगकर्मवीर अण्णा, ‘रयत’चे काही शिक्षक का झालेत सैराट?; नगरच्या 'या' शाळेत तब्बल...

कर्मवीर अण्णा, ‘रयत’चे काही शिक्षक का झालेत सैराट?; नगरच्या ‘या’ शाळेत तब्बल सात शिक्षक निघाले सैराट…

spot_img

पवार साहेब, आवरा तुमच्या जनरल बॉडी सदस्यांसह पदाधिकार्‍यांना / पठार भागातील पालकांनी मुली शाळेत पाठविण्यास दिला नकार / शिक्षकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग | पोलिसांनी ठोकल्या बेड्या | कान्हूरपठार शाळेत तब्बल सात शिक्षक निघाले सैराट
ऑन दी स्पॉट रिपोर्ट / शिवाजी शिर्के
ग्रामीण भागात शिक्षणाची सोय व्हावी आणि मुलांच्या जोडीने मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटलांनी राज्याच्या कानाकोपर्‍यांत रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या. मात्र, त्याच कर्मवीर अण्णांच्या हेतूला हरताळ फासण्याचे काम कधी काळी अत्यंत दर्जेदार शिक्षणासाठी ओळखल्या जाणार्‍या नगर जिल्ह्यातील कान्हूरपठार येथील शाळेत घृणास्पद प्रकार समोर आला आहे. नववीच्या वर्गात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीशी लगट साधत तिच्याशी अश्लिल चाळे करणार्‍या हैवान शिक्षकामुळे आणि त्याला पाठीशी घालणार्‍या रयत शिक्षण संस्थेतील पांडुळे मंत्री या पदाधिकार्‍यामुळे शाळेची पुरती इभ्रत तर गेलीच गेली! परंतु आता रयत शिक्षण संस्थेची देखील इज्जत चव्हाट्यावर आलीय. लिंगपिसाट आणि हैवान झालेल्या शिक्षकाबद्दल मुलीच्या आजोबाने तक्रार देताच पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. बारवकर व त्यांच्या टीमने साहेबराव जर्‍हाड या विकृताला बेड्या ठोकल्या. त्याच्यावर पोक्सोसह अन्य कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे श्री. बारवकर यांनी सांगितले.

कान्हूरपठार परिसरातील एका गावातील पीडित मुलीच्या आजोबांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझी नात जनता विद्यामंदिर, कान्हूर पठार, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथे शिक्षण घेत आहे.  दि. १२ मार्च २०२५ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमाराम मी घरी असताना नात पारनेर येथून कॉलेज करून घरी आली व तिने मला सांगितले की, तिला बहिणीचे कॉलजेचे शिक्षक साहेबराव जर्‍हाड हा त्याच्या बायकोसोबत मोटारसायकलवरून आला व त्याने तिला रस्त्यात अडवून म्हटले की, तुझ्या बहिणीने माझ्याविरुध्द शाळेत तक्रार केली आहे. तिला माझ्या बाजूने जबाब देण्यास सांग. आमचे दोघांमध्ये काही नाही. जर असे केले नाहीस तर तुझ्या बहिणीचे व तुझे शिक्षण कसे होते ते पाहतो. माझा मुलगा लय डेंजर आहे तुला तर मारूनच टाकेल अशी धमकी दिली. पीडितेच्या आजोबांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगा डेंजर आहे, तो तुम्हाला मारूनच टाकेल!
लिंगपिसाट जर्‍हाड याने त्याच्या पत्नीसोबत येऊन पीडितेच्या बहिणीला धमकी देण्याचे धाडस केले. तुझ्या बहिणेचे व तुझे शिक्षण कसे होते ते पाहतो. माझा मुलगा लय डेंजर आहे तुला तर मारूनच टाकेल अशी धमकी देण्यापर्यंत त्याची मजल गेली. हे सारे होत असताना त्याची पत्नी देखील पीडितेला मुलगा डेंजर असल्याचे धमकावत होती. पोलिसांनी जर्‍हाड याला बेड्या ठोकल्या असल्या तरी पीडितेच्या बहिणीला धमकी देणार्‍या जर्‍हाडच्या पत्नीला पोलिसांनी अटक का केली नाही असा सवाल आता पीडितेच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

व्याकरणाचे  पुस्तक दिले, लगट वाढवली अन् गाडीवर बसवून…
पीडितेला विकृत जर्‍हाड याने व्याकरणाचे पुस्तक दिले. यानंतर त्याने लगट वाढवली. फोन नंबर मिळवला आणि तिला तो कधी भेटायचे, कुठे भेटायचे असे विचारू लागला. तसेच आपण प्रत्यक्षात भेटून बोलूयात. मला तुझ्या सोबत बोलावे वाटते असे म्हणत होता. त्यावेळी पीडितेने त्याला हसण्यावारी टाळले होते. त्यानंतर १० वीची परीक्षा दिल्यावर पुन्हा जराड़ सरांनी फोन करून तुझा भूगोलाचा पेपर कसा गेला? मला भेट तुला बोलायाचे आहे. तू जर भेटली नाहीस तर नापास होशील असे म्हटला. यानंतर मे २०२४ मध्ये दुपारच्या सुमारास फोन करून तुला भूगोलाच्या पेपरविषयी बोलायचे असल्याचे सांगून तू चौकात ये असे सांगून बोलावून घेतले. नंतर त्याने त्याच्या मोटारसायकलवर बळजबरीने बसवून येथे आडसाईडला गाडी लावून माझे सोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी पीडिता रडू लागल्याने त्याने जीवे मारण्याची धमकी दिली व तिला पुन्हा चौकात आणून सोडले.

जून महिन्यात पुन्हा तोच प्रकार!
जून २०२४ मध्ये  दोन ते तीन वेळेस दुपाराच्या दोन वाजण्याच्या सुमाराला चौकात बोलावून घेऊन बळजबरीने त्यांच्या मोटारसायकलवर बसवून पुन्हा आडसाईडला घेऊन पुन्हा बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तू मला कॉल का करत नाहीस असे हा विकृत पीडितेला म्हणायचा. त्यावर मला त्रास देऊ नका असे पीडिता त्याला म्हणत होती. मात्र, त्या विकृताने पीडितेला वारंवार त्रास देणे चालूच ठेवल्याने तिने ही हकीकत घरी सांगितली आणि घरच्यांनी थेेट पोलीस ठाणे गाठले.

या कलमानुसार पोलिसांनी नोंदविला गुन्हा!
पारनेर पोलिसांनी पीडितेच्या आजोबांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आणि न्यायालयासमोर पीडिताने दिलेेल्या भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ७४, ७५ (१)(१), ७८, ३५२ (२), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ मधील कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मुलगा आणि पत्नीने विरोध करुनही पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
विकृत मनोवृत्तीच्या साहेबराव जर्‍हाड या शिक्षकाने शिक्षकी पेशासह वडीलकीच्या नात्याला काळिमा फासला असताना आणि त्याचे वर्तन पाठीशी घालण्यासारखे नसतानाही त्याला पाठीशी घालण्याचे काम त्याच्या पत्नी आणि मुलाने केले. गुन्हा दाखल होताच पोलिसांचे पथक लिंगपिसाट जर्‍हाडच्या घरी धडकले आणि त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया करत असताना त्याचा मुलगा आणि पत्नी हे दोघेही अडवे आले. मात्र, पोलिसांनी त्यास जुमानले नाही आणि त्याला बेड्या ठोकून पोलीस ठाण्यात आणले.

संतापलेले आजोबा म्हणाले, पांडुळे, कान्हूरला ये तुझ्याच …ट्या काढतो!
कान्हूरपठारच्या शाळेत संबधित प्रकर घडला असल्याने या शाळेशी निगडीत असणारे रयत संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांच्याशी काही जागरूक नागरिक आणि पीडितेच्या आजोबांनी संपर्क साधला आणि त्यांच्या कानावर घडलेला प्रकार घातला. त्यावर अत्यंत विकृतपणे हास्य करत पांडुळे यांनी या शाळेत याआधीही सहा-सात शिक्षकांनी हाच प्रकार केलाय! त्यांना काहीच कसे समजत नाही. कार्यकर्तेच … खात आहेत, आम्हाला काही देत नाही असे विकृतीचा कळस गाठणारे वक्तव्य केले. यानंतर संतापलेल्या पीडिताच्या आजोबांनी त्याच मोबाईलवर ज्ञानदेव पांडुळे यास खडे बोल सुनावले. पांडुळे तूच या शाळेचे वाटोळे केलेस! तूच या विकृत शिक्षकांना पोसलेस आणि तुला माझ्या नातीसारख्या मुली पाहिजेत का? पांडुळे, तू कान्हूरला ये, तुझ्या …ट्या काढतो, असे जाहीरपणे सुनावले. हा सर्व प्रकार स्पीकर फोनवर घडला आणि तो अनेकांनी ऐकला. यानंतर पांडुळेसह रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकार्‍यांबाबत संताप व्यक्त केला.

पेनड्राईव्हमध्ये सात शिक्षकांचे अत्यंत घृणास्पद संभाषण!
पीडित मुलीने विकृत जर्‍हाड याचा डाव ओळखला आणि तिने त्याचे संपूर्ण संभाषण रेकॉर्ड केले. रेकॉर्डिंग केलेले हे संभाषण पीडितेने एका पेन ड्राईव्हमध्ये घेतले. हा पेन ड्राईव्ह या शाळेतील किमान सात शिक्षकांची विकेट घेणारा ठरणार आहे. या घृणास्पद संभाषणानुसार पोलिसांनी कारवाई केल्यास या शाळेतील किमान सात शिक्षकांच्या हातांत बेड्या पडण्याची शक्यता आहे. सात शिक्षकांनी मिळून अनेक मुलींना असा त्रास दिला असल्याची चर्चा आता पालकांसह ग्रामस्थांमध्ये घडू लागली आहे.

गोरडे खरा सूत्रधार अन् तोच पांडुळेचा सप्लायर
प्रकरण गंभीर असल्याने आणि पोलिसांत गेल्याचे समोर येताच रयतचे सहायक अधिकारी श्री. तोरणे यांनी आज शाळेला भेट दिली. त्यांच्यासमोर ग्रामस्थांसह पालकांनी तक्रारीचा पाढा वाचला. या शाळेत गोरडे नावाच्या आधीच्या शिक्षकाने अनेक मुलींचे लैंगिक शोषण केले. त्याने सहशिक्षकांची यासाठी एक टोळीच तयार केली होती. त्याच्या या टोळीत जर्‍हाड याच्यासह धोत्रे, पठाण, बर्वे हे विकृत शिक्षक सहभागी झाले. या सार्‍यांनी मिळून अनेक मुलींचे शोषण केले. गोरडे हा ज्ञानदेव पांडुळे याच्यासाठी कायम सप्लायरच्या भूमिकेत राहिला. त्याच्याबद्दल मोठ्या तक्रारी झाल्यानंतर त्याचे थेट निलंबन होण्याऐवजी त्याच्या सोयीच्या गावात बदली करण्याचे पाप याच ज्ञानदेव पांडुळे याने केल्याचे ग्रामस्थांनी आज श्री. तोरणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

स्कूल कमिटी बरखास्त करण्याची मागणी
शासनाच्या आदेशानुसार शाळास्तरावर शिक्षण घेत असलेल्या पाल्यांच्या पालकांचा समावेश असणारी स्कूल कमिटी स्थापन करणे आवश्यक असताना रयत संस्थेने कान्हूरपठार गावातील या शाळेत राजकारणी मंडळींचा समावेश असणारी समिती स्थापन केली. या समितीमुळेच शिक्षक सैराट झाले असून त्यांच्या राजाश्रयामुळेच या शिक्षकांनी हे धाडस केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ही स्कूल कमिटीच बरखास्त करण्याची मागणी आता पालकांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हात, पाय, मुंडके तोडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले

माउली गव्हाणे खून झालेल्या व्यक्तीचे नाव | सागर गव्हाणे आरोपी श्रीगोंदा | नगर सह्याद्री -  श्रीगोंदा...

शिवजयंती धूमधडाक्यात साजरी  

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती सोमवारी नगर शहरात...

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांची मोठी घोषणा; म्हणाले “योजना बंद करणार नाही, पण…”

मुंबई / नगर सह्याद्री : लाडकी बहिण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर...

सावधान! आता रस्त्याच्या कडेला वाहने लावणे पडणार महागात; आयुक्तांनी दिला ‘हा’ इशारा

रस्ते व फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाईसाठी पुन्हा मोहीम राबवणार / रस्त्यालगत बंद अवस्थेत लावलेली वाहने...