शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी माझी उमेदवारी – संदेश कार्ले | गावसभांना उत्स्फूर्त प्रतिसाद | नगर तालुका कार्लेंच्या पाठीशी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
माझी उमेदवारी कोणाला त्रास देण्यासाठी नसून शेतकर्यांना न्याय देण्यासाठी आहे. मी निष्ठावंत शिवसैनिक असल्याने भगवा वाचविण्यासाठी आहे. शेतकर्यांच्या समस्या माहित असल्याने त्या सोडविण्यासाठी मी उमेदवारी केली असल्याचे सांगत आपण लोकसभेला पारनेरकरांना साथ दिली आता पारनेरकरांनी आपली सावड फेडावी. नगर तालुक्यातील सर्वसामान्य माणून आमदार करण्याची हीच योग्य वेळ आहे असल्याचे मत अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांनी व्यक्त केले.
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांच्या प्रचाराला नगर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, देऊळगा सिद्धी, सारोळा कासार, घोसपुरीचा दौरा करण्यात आला. या दौर्यात गावागावातील युवक उर्त्स्फूतपणे सहभागी झाले होते.
यावेळी संदेश कार्ले म्हणाले, राजकारणाच्या सुरुवातीलपासून आत्तापर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. पारनेर-नगर तालुक्यातील शिवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, भगवा फडकविण्यासाठी मी उमेदवारी केली आहे. आमदार झाल्यानंतर शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य राहिल. शेत मालाला भाव, पाणी, दिवसा वीज पुरवठा यावर भर देणार आहे. दिवसा वीज पुरवठ्याचे चिचोंडी पाटील मॉडेल बनवायचे आहे. शेतकर्यांच्या अडचणी माहित असल्यामुळे शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन कार्ले यांनी उपस्थितांना केले. नगर तालुक्यातील सर्वसामान्य माणून आमदार करण्याची हीच वेळ असल्याचेही ते म्हणाले.
गावागावांत कार्लेचे जंगी स्वागत
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, जिल्हा परिषदचे सदस्य संदेश कार्ले यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. नगर तालुक्यात पंचायत समिती सभापती पदाच्या व जिल्हा परिषदच्या माध्यमातून कार्ले यांनी विकास कामे मार्गी लावली आहेत. सर्वसामान्यांना न्याय देणारा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तसेच घोसपुरी पाणी योजनेच्या माध्यमातून महिलांच्या डोक्यांवरील हंडा उतरविला आहे. त्यामुळे नगर तालुक्यात संदेश कार्ले यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावागावात पुष्पवृष्टी करत ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले जात आहे.
संदेश आमचा लाडका भाऊ; महिलांना झाले अश्रू अनावर
नगर तालुक्याला पाण्याचा शाश्वत सोर्स नाही. बुर्हाणनगर व घोसपुरी पाणी योजनेवर नगर तालुकाकरांची तहान भागविली जाते. बंद अवस्थेत असलेली घोसपुरी पाणी योजना संदेश कार्ले यांनी सुरु करुन नफ्यात आणली. घोसपुरी पाणी योजनेच्या अंतर्गत येणार्या गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचे काम केले. नगर तालुक्यातील खडकी, बाबुर्डी, घोसपुरी, देवळगाव सिद्धी, खंडाळा, अरणगाव, सोराळा कासार गावात घेतलेल्या कॉर्नर सभांना महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संदेश कार्ले यांनी आमच्या डोक्यावरील हंडा उतरविल्याने संदेशच आमचा लाडका भाऊ असल्याच्या भावना व्यक्त करत केल्या. यावेळी महिलांना अश्रू अनावर झाल्याचे पहावयास मिळाले.