spot_img
ब्रेकिंगकरिश्मा कपूरवर दुःखाचा डोंगर; पतीचे हार्ट अटॅकमुळे निधन

करिश्मा कपूरवर दुःखाचा डोंगर; पतीचे हार्ट अटॅकमुळे निधन

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
बॉलिवूडमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती आणि उद्योजक संजय कपूर यांचे वयाच्या ५३व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यूकेमध्ये पोलो खेळताना मैदानावरच त्यांना हार्ट अटॅक आला आणि काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला. संजय कपूर हे ‘सोना कॉमस्टार’ या ऑटो कंपोनेंट्स उत्पादन करणाऱ्या आघाडीच्या कंपनीचे चेअरमन होते. त्यांच्या अकस्मात निधनाने कॉर्पोरेट क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.

संजय कपूर हे युनायटेड किंगडममध्ये पोलो स्पर्धेत सहभागी झाले होते. खेळादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तात्काळ वैद्यकीय मदत मिळवण्यात आली, मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आले. विशेष म्हणजे मृत्यूपूर्वी केवळ काही तास आधी त्यांनी अहमदाबादमध्ये १२ जून रोजी घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातावर ट्विट करत शोक व्यक्त केला होता. हे ट्विट आता त्यांच्या शेवटच्या भावना म्हणून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचे लग्न २००३ साली झाले होते. मात्र, हे वैवाहिक जीवन दीर्घकाळ टिकले नाही. २०१६ साली त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला. त्यानंतर २०१७ मध्ये संजय कपूर यांनी प्रिया सचदेव यांच्याशी विवाह केला. त्यांच्या या विवाहातून अजारियस नावाचा मुलगा असून तो केवळ ७ वर्षांचा आहे.करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांना दोन मुले – समायरा आणि कियान – असून, संजय कपूर यांच्या निधनामुळे केवळ करिश्मा नव्हे, तर संपूर्ण कपूर आणि सचदेव कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...