spot_img
अहमदनगरकारखान्याबद्दल कर्डिलेंचे प्रेम पुतणा मावशीचे- चाचा तनपुरे

कारखान्याबद्दल कर्डिलेंचे प्रेम पुतणा मावशीचे- चाचा तनपुरे

spot_img

राहुरी | नगर सह्याद्री
मला आमदार करा, तनपुरे कारखाना सुरू करतो हे सांगणारे शिवाजी कर्डिले यांचे पुतणा मावशीचे प्रेम पुन्हा जागे झाले आहे. जिल्हा बँकेची जप्ती कर्डिलेंनीच आणली हे सभासद, कामगारांना समजले आहे. केवळ विधानसभेत मते मिळावी म्हणून कारखाना सुरू करतो, विकास करून दाखवतो म्हणणार्‍या कर्डिलेंच्या खोटारड्या गप्पा जनतेच्या लक्षात आल्याची टीका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी केली.

कर्डिले यांनी प्रचारादरम्यान राहुरी कारखाना सुरू करणार असल्याचे आश्वासन दिल्यावर चाचा तनपुरे म्हणाले, तनपुरे कारखान्याची एकहाती सत्ता विखे-कर्डिलेंच्या ताब्यात होती. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून कर्डिले यांची वर्णी लागली. जिल्हा बँकेमार्फत मदत करण्याऐवजी कारखाना बंद पाडण्याचे काम झाले. जिल्हा बँकेवर जप्ती आणली. कारखाना बंद पाडून प्रशासक आणणारे कर्डिले यांचा खरा चेहरा जनतेला समजला आहे. कर्डिलेंनी आता तनपुरे कारखान्याबाबत पुतणा मावशीचे प्रेम दाखवूच नये. लोकसभा निवडणुकीतही कर्डिले यांनी सभासद, कामगारांना कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. आता पुन्हा विधानसभा लागताच कर्डिलेंनी खोट्या प्रचाराचा पेटारा उघडला आहे. परंतु राहुरी परिसरातील जनता खुळी नाही. थोरात, तनपुरेंच्या मदत घेऊ!

महाविकास आघाडी सत्तेवर येणारच असून आ. बाळासाहेब थोरात, आ. प्राजक्त तनपुरे यांच्या मदतीने कारखाना सुरू करण्याबाबत चांगला निर्णय होईल, असेही चाचा म्हणाले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...