तनपुरेंसारखा निष्क्रिय लोकप्रतिनिधी लाभल्याने मतदारसंघात विकासाला खीळ बसली: शिवाजीराव कर्डिले / महायुती भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचा बारागाव नांदूर परिसरात प्रचार दौरा
राहुरी / नगर सह्याद्री –
केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना बारागाव नांदूर परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने राबवित असताना नियमात बसत नसलेले कामे ते नियमात बसवून देत जनतेला लाभ मिळून देण्याचे काम केले. मी कामाचा लोकप्रतिनिधी आहे. बारागाव नांदूर पाणी योजनेचे वीज बिल थकीत होते. ते माफ करून १७ गावांची योजना सुरू केली. कै. शिवाजीराव गाडे हे स्वाभिमानी नेते होते. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात जाऊन प्रश्न सोडविण्याचे काम करत असल्यामुळेच जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. त्याचा राग धरून तनपुरे कुटुंबियांनी गाडे कुटुंबियांना संपविण्याचे काम केले. मात्र यापुढे शिवाजीराव कर्डिले त्यांच्या पाठीमागे खंभीरपणे उभा आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये आदिवासी समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. कैलासवासी शिवाजी गाडे यांच्यामुळेच मी आमदार झालो. त्यांचा मुलगा धनराज गाडे तनपुरे कुटुंबांचा स्पर्धक होऊ नये म्हणून गाडे कुटुंबाला अडचणीत आणण्याचे काम केले गेले. तनपुरे यांनी दिलेले आश्वासने पूर्ण केली नाही. म्हणून गावोगावची जनता माझ्या पाठीमागे उभी आहे. निष्क्रिय लोकप्रतिनिधी असल्यामुळे जनतेचा उद्रेक झाला असून माझी निवडणूक जनतेनेच हाती घेतले आहे, असे प्रतिपादन भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी बारागाव नांदूर, कुरणवाडी, चिंचाळे, गडचे आखाडा, घोरपडवाडी, मल्हारवाडी, मोमिन आखाडा, बोरटेक परिसरात प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, विक्रम तांबे, प्रभाजी सुळ, सारंगधर पवार, ज्येष्ठ नेते कैलास पवार, युवराज गाडे, राजेंद्र गोपाळे , रखमा खिलारी, सुरेश बांदकर, नसीर शेख, भारत जाधव,
अण्णासाहेब भास्कर, साहेबराव शिंदे, सयाजी श्रीराम, अशोक घाडगे, संदीप गाडे, शिवाजी सागर, रघुराम शिंदे, बाबासाहेब धोंडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
तनपुरेंच्या पायाखालची वाळू सरकली : धनराज गाडे
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी कधीही विकास कामात राजकारण केले नसून विरोधकांचे देखील काम केले आहे. शेतकरी मंडळ माजी मंत्री कर्डिले यांच्या पाठीमागे उभे आहे. माझी मागच्या वेळेस चूक झाली. बारागाव नांदूर पाणी योजना लाईट अभावी बंद करण्यात आली होती. मात्र कर्डिले यांना एक फोन केला आणि 17 गावाची पाणी योजना सुरू झाली. शिवाजीराव कर्डिले हे कामाचा माणूस आहे .तनपुरे कुटुंब अफवा पसरवण्यात पटाईत आहे त्यांनी मला राजकारणातून संपविण्याची काम केले. राहुरी तालुक्यातील जनता परिवर्तनाची वाट पाहत असून 23 तारखेला आपला विजय निश्चित होईल. तनपुरे कुटुंबीयांनी माझी बदनामी करायला सुरुवात केली असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.मी गेल्या पंधरा वर्षांपासून राहुरी तालुक्यातील जनतेशी भेट संपर्कात असल्यामुळे त्यांना आता माहित आहे खरी दहशत कोणाची आहे, असे मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गाडे यांनी व्यक्त केले.