spot_img
अहमदनगरpolitics news: पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डीले सज्ज? राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरेच!

politics news: पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डीले सज्ज? राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरेच!

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री :-
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. दरम्यान अहमदनगरचा राहुरी विधानसभा मतदार संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांनी राहुरी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटीयांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शिवाजी कर्डिले हे राहुरी ऐवजी श्रीगोंद्यातून निवडणूक लढवतील असं वाटत असताना आता शिवाजी कर्डिले यांनी आपण राहुरीतुनच निवडणूक लढवणार हे स्पष्ट केले आहे. २०१९ मध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले यांचा राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी पराभव केला होता.

आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवाजी कर्डीले हे सज्ज झाले असून राहुरी विधानसभा मतदारसंघातील जनतेनेच मला राहुरीतून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला असल्याचं शिवाजी कर्डिले यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजप नेते शिवाजी कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राष्ट्रवादीचे धक्का तंत्र; निवडणुकीचा सूर बदलला!, बारामती पॅटर्नची झलक दिसणार?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीला आता रंग चढला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत...

‘जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी प्रथम पुरस्कार’

राहाता । नगर सहयाद्री:- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राज्याच्या जलसंपदा विभागाला बेस्ट स्टेट कॅटेगरी २०२४...

लाडक्या बहिणींना दिलासा! पती व वडील हयात नसलेल्या महिलांनाही KYC करता येणार, वाचा प्रोसेस..

मुंबई | नगर सहयाद्री:- लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रियेबाबत राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा दिलासा...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींना शुभ ‘गुरुवार’

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा...