नीटमध्ये यश मिळाल्याबद्दल मित्र परिवार व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार
सुपा | नगर सह्याद्री
करण दादाभाऊ ठुबे याने नीटमध्ये उज्वल यश मिळवून कुटुंब, गाव, पारनेर पब्लिक स्कूलचे नाव उंचावले आहे. करणने उज्वल यश मिळविल्याबद्दल उद्योजक, मित्र परिवार व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
पारनेर तालुक्यातील बाबुड गावातील ठुबे कुटुंब नेहमीच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असते. कुटुंबियांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉ. दादाभाऊ ठुबे यांच्या मुलाने करण ठुबे याने नीट 2025 मध्ये 720 पैकी 515 गुण मिळवून गर्व्हमेंट मेडिकल कॉलेय यवतमाळ येथे एमबीबीएस साठी स्थान मिळवून आपल्या कुटुंबियांचे, बाबुड गावचे तसेच पारनेर पब्लिक स्कूलचे नाव उंचावले आहे. डॉ. ठुबे यांची कन्या दिव्या ठुबे हिने 2022 मध्ये 720 पैकी 603 गुण मिळवून गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे एमबीबीएससाठी आपले स्थान मिळवले होते. बहिणीच्या पाठोपाठ भावानेही नीटमध्ये उज्वल यश मिळविले आहे.
सध्याच्या हॉटसॲपच्या जमान्यात सुद्धा मोबाईलच्या आहारी न जाता कुठलाही क्लास न लावता फक्तआपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनावर तसेच प्राचार्य गिताराम म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पब्लिक स्कूलचे नाव करण दादाभाऊ ठुबे यांने झळकावले असल्याचे चुलते माजी सैनिक विजय ठुबे यांनी सांगितले. करणचे आजोबा हौसराव चुलते विजय ठुबे हे सैन्य दलात होते. त्यांचे वडिल डॉ. दादाभाऊ ठुबे हे पशुवैद्यकीय सेवा करत आहेत. तर त्यांचे एक चुलते डॉ. शिवाजी ठुबे शास्त्रज्ञ आहेत. नातवंडांना घडविण्यासाठी त्यांची आजी मंगल ठुबे यांचा सिंहाचा वाटा आहे.
करणला शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी ठुबे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले. भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, माजी सरपंच सागर मैड यांनी करणचे अभिनंदन केले. यावेळी विकास गाजरे मेजर, दत्तात्रय बाबुराव दिवटे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद दिवटे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रविण दिवटे, भाऊ दिवटे, संतोष दिवटे, लखन जगताप, प्रकाश पिसे, पोपट दिवटे, उद्योजक ज्ञानदेव जगताप, तेजस दिवटे, योगेश दिवटे, विक्रम गाडगे, विशाल गाडगे तसेच विकास गाडगे मित्र परिवाराने व ग्रामस्थांनी करणचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.