spot_img
अहमदनगरकान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

कान्हूरपठारकरांनी गावासह शाळाही ठेवली बंद

spot_img

शेकडो पालकांसह ग्रामस्थांचा आक्रोश | ‌‘रयत‌’ च्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती | विद्याथनींमध्ये घबराटीचे वातावरण

‌‘रयत‌’ची प्रतिमा डागळवणरा ज्ञानदेव पांडुळे केला संस्थेतूनच हद्दपार | साहेबराव जऱ्हाडसह सुहास गोरडेवर निलंबनाची कारवाई

कान्हूरपठार | नगर सह्याद्री:-
कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कान्हूरपठार (पारनेर) येथील शाळेतील वासनांध शिक्षक साहेबराव जऱ्हाड याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्यानंतर त्याला बेड्या पडल्या! पोस्कोसह विविध कलमान्वये अटकेत असलेला जऱ्हाड हा पारनेर पोलिसांच्या कस्टडीत आहे. त्याच्याकडून अन्य कोणकोणत्या मुलींचा विनयभंग केला किंवा कसे याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी संस्थेच्या सल्लागार मंडळाचा सदस्य म्हणून मिरवून घेणारा ज्ञानदेव पांडुळे उर्फ मामा उर्फ मंत्री हाच असल्याचे स्पष्टपणे समोर आले असून त्याच्याच आशीर्वादाने हे रॅकेट चालवले जात असल्याचेही समोर आल्यानंतर पांडुळे याच्यावर संस्थेच्या सर्व शाखांमधून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येत असून याच पांडुळे मामाचा आश्रय लाभलेला दुसरा वासनांध शिक्षक सुहास गोरडे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी ‌‘नगर सह्याद्री‌’शी बोलताना दिली. दरम्यान, साहेबराव गोरडे हा पोलिस कोठडीत असला तरी त्याच्यावर दाखल गुन्ह्याची गंभीर दखल घेत त्याच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे श्री. चंद्रकांत दळवी यांनी सांगितले. दरम्यान, कान्हूरपठार(ता.पारनेर) येथे झालेल्या गैर प्रकारा विरोधात व आरोपी शिक्षक साहेबराव जऱ्हाड याला कठोर शासन व निलंबित करण्यासाठी ग्रामस्थांनच्या वतीने मंगळवारी गाव बंद व शाळा बंद ठेवण्यात आले. व्यापाऱ्यांसह दुकानदार आणि खासगी आस्थापना चालकांनी बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला. सरपंच सौ. संध्या किरण ठुबे, उपसरपंच प्रसाद नवले, स्कुल कमिटी सदस्य सखाराम ठुबे, सौ. जयश्री घावटे यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते.

वासनांध जऱ्हाड दोन दिवसांच्या कोठडीत!
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी साहेबराव जऱ्हाड याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोठडीत त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली.

तोरणे, नरवडेंना पालकांनी घेरले!
अतिशय निंदनीय प्रकाराने कान्हूरपठार गावकऱ्यांनी आणि पालकांनी गावबंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी रात्रीच जाहीर केला. दरम्यान, याबाबत पालकांशी चर्चा करण्यासह शाळेला भेट देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे विभागीय अधीकारी प्रमोद तोरणे आणि विभाग प्रतिनिधी प्रशांत नरवडे हे सकाळीच कान्हूरपठारमध्ये दाखल झाले. त्यांना पालकांनी फैलावर घेतले आणि

अनेक गंभीर बाबी त्यांच्यासमोर मांडल्या!
पारनेर पोलीस स्टेशनचे पीआय समीर बारवकर यांनी भेट देऊन पालकांचे म्हणणे ऐकून घेतले. संतप्त पालक आणि ग्रामस्था यांच्या भावना समजून घेताना शाळेत अशाप्रकारचे विकृत कृत्य करणारे अन्य कोणीही असो त्यांना कायद्याचा धाक नक्कीच दाखवू. याबाबत पालकांनी अथवा ग्रामस्थांनी लेखी तक्रार द्यावी. दोषींना सोडणार नाही.
– समीर बारवकर, पोलिस निरीक्षक पारनेर

वासनांध गोरडेने पुन्हा साधला पिडीतेशी संपर्क!
सुहास गोरडे याच्याबद्दल आज ग्रामस्थांसह पालकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. तो या शाळेत असताना त्याने अनेक मुलींचा विनयभंग केल्याचे पुरावेही मांडले गेले. पिडीत मुलीशी तो सातत्याने संपर्कात राहिला असल्याचेही त्याच्या मोबाईल कॉल डिटेल्समधून समोर आले आहे. सदर प्रकरणात गोरडे याचा सहकारी साहेबराव जऱ्हाड याला अटक होताच आणि या घटनेचे पडसाद उमटताच सुहास गोरडे प्रचंड हादरला. तो त्याचे कारनामे थांबवील असे वाटत असताना गेल्या चोवीस तासात तो पिडीत मुलीच्या सातवेळा संपर्कात आल्याचे समोर आले आहे.

नातीच्या वयातील मुलींवर डोळा ठेवणारा पांडुळे हा ‌‘रयत‌’साठी ठरला कंसमामा!
कान्हूरपठारच्या बाजारतळावर जमलेल्या ग्रामस्थांसह पालकांनी पोलिसांसह रयतच्या अधिकाऱ्यांकडे पांडुळेला समोर आणा! त्याच्या ‌‘…ट्या‌’ ठेचायचे आहेत, त्याला लाथा घालून तुडायचे असल्याच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्याच्या नातीच्या वयातील मुली त्याला पाहिजे काय, त्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा बंदोबस्त करतो अशा शब्दात पालकांसह गावकऱ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

चित्रकलेचा शिक्षक असूनही क्रिडास्पर्धासाठी गोरडे कसा काय घेऊन जायचा मुलींना संगमनेर, कोपरगावला?
सुहास गोरडे हा चित्रकलेचा शिक्षक! मात्र, त्याच्या कला त्याने भलतीकडेच दाखवल्या. चित्रकलेपेक्षा त्याला रस राहिला तो क्रीडाप्रकारांमधील स्पर्धांमध्ये! संगमनेर, कोपरगावमध्ये क्रिडा स्पर्धांसाठी त्याने काही मुली नेल्या! त्याच्या चारचाकी वाहनातून त्याने रात्री बारापर्यंत त्यांना फिरवले. संगमनेर मुक्काम केला. याचे पुरावे स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य सखाराम ठुबे यांनी आज रयतच्या अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांसमोर ठेवले. याबाबत प्राचार्यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला ‌‘पांडुळे मामाचा निरोप आहे, सुहासला स्पर्धांसाठी मुलींना घेऊन पाठवा‌’, असे उत्तर दिल्याचे सखाराम ठुबे यांनी सांगितले. दरम्यान, चित्रकलेचा शिक्षक असतानाही सुहास गोरडे याला क्रिडा स्पर्धांसाठी फक्त मुलींनाच घेऊन जाण्यात कोणता रस होता हे आता समोर आले आहे.

महिला शिक्षिकांशी लगट करणारा सुहास मंत्री मामाचीही मज सांभाळायचा!
सुहास गोरडे याच्याबद्दल रयतच्या पारनेर तालुक्यातील अळकुटीसह अन्य शाखांमधील सेवेत असताना अनेक तक्रारी आल्या. काही महिला शिक्षीकांना त्याने जाळ्यात ओढण्याचा प्रयत्नही केला. त्याच्याबद्दल काहींनी थेटपणे तक्रारीही केल्या. मात्र, ज्ञानदेव पांडुळे याची ‌‘खास मज‌’ सांभाळत असणाऱ्या सुहासवर संस्थेकडून बदलीशिवाय अन्य कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. जर ती झाली असती तर आज कान्हूरपठारची पुनरावृत्ती टळली असती.

ज्ञानदेव पांडुळे: चहाटपरी चालक ते मंत्री मामा!
घुमरी (कर्जत) येथून आलेला ज्ञानदेव पांडुळे याचे मार्केटयार्ड गेटशेजारी म्हणजेच आताच्या आवळा हाऊस शेजारी चहाची टपरी होती. नगर महाविद्यालयात त्यावेळी झालेल्या एका कार्यक्रमासाठी तब्बल पाच मंत्री आले होते. माजी मंत्री स्व. शंकरराव काळे यांच्या सहवासात असलेल्या पांडुळे याने शंकरराव काळे यांना गळ घातली आणि या सर्व पाचही मंत्र्यांना त्याच्या चहाच्या टपरीचे ओपनींगसाठी आणले. चहाच्या टपरीवर पाच मंत्री आल्याच्या दिवसापासून पांडुळे याचे नामकरण मंत्री असे झाले ते आजपर्यंत! याचवेळी त्याने काळे साहेबांच्या आशीर्वादाने ठेकेदारी सुरू केली. कासारे (पारनेर) येथील पाझरतलावाचे काम त्याने घेतले आणि टाकळीढोकेश्वरमध्ये त्याने बस्तान मांडले. तेव्हापासून हे महोदय मंत्री मामा ऊर्फ पांडुळे मामा म्हणून पुढे आले. काळे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून त्यांची रयतमध्ये उठबस वाढली आणि त्याने एलआयसी एजंट म्हणून रयतमधील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांकडून विमा पॉलिसीचा व्यवसाय चालू केला. दरम्यानच्या कालावधीत नगरमध्ये नगरसेवक म्हणूनही ते निवडून आले. रयतच्या माध्यमातून बस्तान बसताच त्याच्या हाती सुहास सारखी बाळं लागली आणि मग जो प्रवास सुरू झाला तो कान्हूरपठारच्या घटनेपर्यंत आला!

पांडुळेचा अन्‌‍ पारनेरचा संबंध काय? त्याच्याबद्दल शेकडो तक्रारी!
ज्ञानदेव पांडुळे याच्याबद्दल यापूवही अनेक तक्रारी आल्या आहेत. हे गृहस्थ मुळेच कर्जत तालुक्यातील. नगर शहरात राहतात. त्यांचा आणि पारनेरमधील रयतच्या शाखांचा काहीही संबंध नाही. त्यांच्याशी आमच्या शाखेतील कोणी शिक्षक अथवा प्राचार्य सलगी करुन राहत असतील तर त्यांची दखल घ्यावीच लागेल. मात्र, पांडुळे यांच्याबद्दल यापूव अनेक गंभीर तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारींची चौकशी लावण्यात आली असून याबाबत दोन दिवसात मोठी कारवाई झालेली दिसेल अशी भूमिका चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी ‌‘नगर सह्याद्री‌’शी बोलताना मांडली.

रयतचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी घेतली गंभीर दखल!
कान्हूरपठारच्या शाळेत घडलेला प्रकार निंदणीय असून या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल संस्थेने घेतली आहे. वासनांध शिक्षक साहेबराव जऱ्हाड याच्यावर दाखल गुन्ह्यातील एफआयआर ची कॉपी संस्थेला मिळाली असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुसरे शिक्षक सुहास गोरडे याची अनेककृष्णकृत्ये समोर आली होती. त्यामुळेच त्याची बदली टाकळीभान येथे करण्यात आली. बदलीतून त्याने काहीच धडा घेतलेला दिसत नाही. त्यामुळेच त्याच्यावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. शाळेतील दोषी शिक्षक आणि ज्यांच्याबद्दल ग्रामस्थांना आक्षेप आहे, त्या सर्वांच्या लागलीच बदल्या केल्या जातील असे स्पष्ट आश्वासन रयतचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी पालक आणि ग्रामस्थांशी दूरध्वीनवरुन बोलताना दिले.

स्कुल कमिटी बरखास्त, पालकांचा सहभाग असणारी नवीन कमिटी करणार; चंद्रकांत दळवी
कान्हूरपठारच्या शाळेत तीन सदस्यांची स्कुल कमिटी आहे. त्यातील एकजण पतसंस्था घोटाळ्यात अटकेत आहेत. उर्वरीत दोघांपैकी एकाने याच वासनांध सुहास गोरडे याची बदली रद्द करण्यासाठी शाळेत आंदोलन केल्याचे समोर आले असून तशा बातम्यांची कात्रणे देखील प्राप्त झाली आहेत. वासनांध शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या या सदस्याची गंभीर दखल घेतली असून आता या शाळेतील स्कुल कमिटीच बरखास्त करण्यात येत आहे. पालकांचा सहभाग असणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांच्या समन्वयातून नवीन समिती गठीत केली जाईल, अशी माहिती चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी ‌‘नगर सह्याद्री‌’शी बोलताना दिली.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, लाखो महिला अपात्र, पहा कारण

मुंबई / नगर सह्याद्री : लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होणार असल्याचे...

पैसे वसुलीस नेमलेल्यांनीच परदेशींचा काढला काटा!

10 कोंटींची खंडणी मिळत नसल्याने आवळला गळा | मृतदेह नालीत फेकला अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर...

उन्हापासून दिलासा मिळणार, पाऊस हजेरी लावणार! जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान..

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे....

नागपूरमधील घटना ‘त्यांच्या’ सुनियोजित पॅटर्न; सी.एम. फडणवीस यांनी संगितला घटनाक्रम..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यावरून...