spot_img
अहमदनगरकान्हूरपठार: लाल मातीच्या मैदानात रंगणार कुस्त्यांचा आखाडा; श्रावणी बैल पोळ्याची जय्यत तयारी,...

कान्हूरपठार: लाल मातीच्या मैदानात रंगणार कुस्त्यांचा आखाडा; श्रावणी बैल पोळ्याची जय्यत तयारी, नृत्यांगना हिंदवी पाटील लावणार हजेरी

spot_img

कान्हूरपठार। नगरसह्याद्री:-
कान्हूरपठा (ता.पारनेर) येथे येत्या शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या श्रावणी बैल पोळ्याच्या पार्श्वभूमीवर गावात मोठ्या उत्साहाने तयारी सुरू आहे. दुसऱ्या दिवशी, शनिवार, २३ ऑगस्ट रोजी गौराई यात्रा भरणार असून, यावेळी जंगी कुस्त्यांचा आखाडा आणि नृत्यांगना हिंदवी पाटील देखील हजेरी लावणार आहे.

कान्हूरपठारचा पोळा राज्यात प्रसिद्ध असून, गावात दुसरी कोणती मोठी यात्रा नसल्याने बाहेर गावी असलेले चाकरमानी आणि गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात. बैल सजावटीसाठी लागणारे साहित्य, पाळणे, गृहउपयोगी वस्तू यांची दुकाने गावात थाटण्यात आली आहेत. बैलांसमोर नाचण्यासाठी हौशी शेतकऱ्यांना कडून नृत्यांगना देखील ठेवण्यात आलेल्या आहेत. २३ ऑगस्ट रोजी मुक्तीधाम मंदिर (पारनेर रोड) येथे कुस्त्यांचा आखाडा लाल मातीच्या मैदानात रंगणार आहे. यात्रा कमिटीच्या वतीने लाल मातीचे कुस्तीचे मैदान तयार करण्यात आले आहे.

प्रथम क्रमांकाची मानाची कुस्ती अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे. या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन भरत फुलमाळी आणि महाराष्ट्र चॅम्पियन अनिल कोकणे आमनेसामने भिडणार आहेत.या मानाच्या कुस्तीसाठी ७१ हजार रूपयांचे बक्षीस खासदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच स्व. सदाशिव दौलतराव साळवे यांच्या स्मरणार्थ विजयानंद साळवे यांच्याकडून ‘चांदीची गदा’ देखील विजेत्या पहिलवानास प्रदान केली जाणार आहे. द्वितीय क्रमांकाची मानाची कुस्ती महत्त्वाची ठरणार आहे. या कुस्तीमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन मनोज फुले आणि श्रीगोंदा केसरी विजय पवार यांचा सामना होणार आहे.

या कुस्तीसाठी पंचायत समितीचे माजी सभापती स्व. रावसाहेब (आण्णा) ठुबे यांच्या स्मरणार्थ सरपंच संध्या किरण ठुबे यांच्यावतीने ६१ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तृतीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन दीपक पवार व महाराष्ट्र चॅम्पियन तेजस वल्लाकट्टी यांच्या मध्ये होणार असून फौजी ब्रदर्स प्रतिष्ठानच्या वतीने ५१ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

चतुर्थ क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन अंकित धुळगंड आणि महाराष्ट्र चॅम्पियन पैश्याम सोनलकर यांच्या सामन्याने रंगणार आहे. या कुस्तीसाठी कै. शंकर तुकाराम ठुबे (नायब तहसीलदार) यांच्या स्मरणार्थ बापू रावसाहेब चत्तर यांच्या वतीने ४१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. पाचव्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन लक्ष्मण धनगर आणि महाराष्ट्र चॅम्पियन सुरेंद्र शिंदे यांच्यात होणार आहे.

या कुस्तीसाठी कै. शंकर मामा ठुबे यांच्या स्मरणार्थ चंद्रभान ठुबे मित्र मंडळाच्या वतीने ३१ हजार रूपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. सहाव्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन ज्ञानेश्वर राऊत आणि महाराष्ट्र चॅम्पियन कुमार देशमाने यांच्यात होणार आहे. या कुस्तीसाठी कै. बाजीराव रमाजी ठुबे यांच्या स्मरणार्थ पै. सूरज नवले व ग्रामपंचायत सदस्य धनंजय ठुबे यांच्या वतीने २१ हजार रूपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

सातव्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन देवराज खोसे आणि महाराष्ट्र चॅम्पियन नवनाथ चौरे यांच्या दरम्यान होणार आहे.या कुस्तीसाठी कै. रेवजी गणपत तांबे यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत सदस्य गणेश तांबे व संदीप तांबे यांच्या वतीने ११ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. कुस्ती स्पर्धेतील सर्व विजेत्यांना पहिल्यांनाना स्व. व्ही. बी. ठुबे सर यांच्या स्मरणार्थ पत्रकार श्रीकांत ठुबे यांच्याकडून मानांची ढाल देण्यात येणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

रामा तराळसह झावरे, खिलारी अडकले जाळ्यात; वाळू तस्करीच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला प्रकरण

पारनेर | नगर सह्याद्री वासुंदे येथे वाळू तस्करीच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीच्या...

… तर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार; अमित शाहांनी मांडली तीन विधेयके

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत तीन महत्त्वाची...

शनिशिंगणापूर प्रशासनाचा मोठा निर्णय, शनी अमावस्येला ‘या’ ठिकाणी भाविकांना प्रवेशबंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शनिशिंगणापूर येथील शनिदेव मंदिरात दरवर्षी शनी अमावास्येला लाखो भाविक दर्शनासाठी...

टेलेंम नसल्याने कचरा गाडीचा अपघात; जखमी लोखंडे यांची मोठी मागणी

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव रोड चौकात मंगळवारी सकाळी ८ वाजता घडलेल्या...