कार्यकारी संचालक नमिता ठुबे | ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
कान्हूर पठार | नगर सह्याद्री
कान्हूरपठार को-आँप. क्रेडिट सोसायटी मर्यादित (मल्टीस्टेट) पतसंस्था सभासदांना बारा टक्के लाभांश देणार असल्याचे पतसंस्थेच्या कार्यकारी संचालक नमिता ठुबे म्हणाल्या.
कान्हूरपठार (ता. पारनेर) येथे संस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. संस्थेचे दिवंगत कार्यकारी संचालक दिलीपराव ठुबे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेस सुरुवात झाली.
ठुबे म्हणाल्या संस्थेच्या स्थापनेपासून अनेक चढ-उतार अनुभवलेले आहे. परंतु सर्व पतसंस्था कार्यक्षेत्रातील सभासद, कर्जदार, ठेवीदार व हितचिंतक यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे अहवाल तसेच संस्थेच्या धोरणात्मक कर्ज वाटप पद्धती व कडक वसुली धोरणामुळे ७९.७४ टक्के कर्ज वसुली केली आहे. त्याच बरोबर पतसंस्था भविष्यात स्थिर-स्थावर राहण्यासाठी तसेच आर्थिक सक्षमता येण्यासाठी संस्थेने अहवाल सालात ३ कोटी रुपये एनपीए तरतूद केली असून सन २०२४-२०२५ अखेर २४.६६ कोटी रुपये एनपीए तरतुदी पोटी सचित आहे. अहवाल साला अखेर ७०.६९ कोटीची गुंतवणूक केली आहे.
संस्थेने आधुनिकतेची जोड धरत १७ शाखांच्या माध्यमातून कोअर बँकिंग सुविधा, एटीएम, आरटिजीएस, एनईफटी, लाईट बिल भरणा, फास्ट टॅग रिचार्ज या सुविधा सुरू केल्याने संस्थेच्या खातेदारांची वाढ झाली आहे.वर्षीक सभेमध्ये सभासद सहादू नवले, संतोष ठुबे, सखाराम ठुबे, संजय ठुबे, बबन जोशी, रंगनाथ फापाळे, श्रीकांत ठुबे, द.मा.ठुबे, अशोक ठुबे, लहाणू शेळके, लहू बुचूडे, यांंनी विविध मुद्यावर प्रश्न उपस्थितीत केले. त्या सर्व प्रश्नांची कार्यकारी संचालक नमिता ठुबे यांनी उत्तरे दिली. संस्थेच्या चेअरमन सुशीला ठुबे यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.याप्रसंगी चेअरमन सुशीला ठुबे, व्हा.चेअरमन पी.के ठुबे, संचालक पोपट झावरे,सुहास शेळके, गवराम गाडगे, सुभाष नवले, राजेंद्र व्यवहारे, मंगेश गगारे, संपत खरमाळे, मधुकर साळवी, रामदास ठुबे, दादाभाऊ नवले, भास्कर ठुबे, भगवान वाळूंज, राजेंद्र रोकडे, कार्यकारी संचालक नमिता ठुबे उपस्थितीत होत्या.
६२ सभासदांना अपघात विमा
कर्जदार सभासदांच्या हिताचा विचार करून संस्थेने कर्जदार सभासद अपघात विमा योजना सुरू केली असल्याने त्या कुटुंबास या योजनेचा आधार मिळाला आहे. आतापर्यंत ६२ सभासदांना पाच लाख ते पन्नास लाख रुपयांपर्यंत अपघात विम्याची सुविधा देण्यात आली आहे.
– सुशीला ठुबे,
चेअरमन कान्हूरपठार पतसंस्था