spot_img
ब्रेकिंगकबड्डीमॅटचे मैदान उभारणीचे काम अंतिम टप्प्यात; एकाच वेळी होणार 'इतके' सामने

कबड्डीमॅटचे मैदान उभारणीचे काम अंतिम टप्प्यात; एकाच वेळी होणार ‘इतके’ सामने

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
येथे दि. २१ पासुन होणार्‍या ७० व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पधसाठी कबड्डीमॅटचे भव्य मैदान उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असुन एकाच वेळी चार सामने प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. सुमारे ३० हजार प्रेक्षक बसु शकतील अशी प्रेक्षा गॅलरी उभारण्यात आली आहे.

नगरच्या वाडिया पार्क येथील क्रीडा संकुलात मॅटवर ही स्पर्धा २१ मार्च ते २४ मार्च या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेकडे संपूर्ण जगभरातील, कबड्डी प्रेमाचे लक्ष लागलेले आहे. नगरमध्ये प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी स्पर्धा होत असुन यात देशातील ३२ राज्याचे संघ सहभागी होणार आहेत. आज तीन राज्याचे संघ नगरमध्ये दाखल झाले असुन उर्वरीत संघ बुधवारी दुपारपर्यंत नगर शहरात दाखल होणार आहेत.

या स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावरील मैदान तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मॅटचे चार मैदान तयार करण्यात आले असुन एकाच वेळी चार सामने होणार आहेत. रोज ३० सामने होणार आहे. प्रकाशझोतात सामने होणार असल्याने प्रेक्षकांची मोठी गर्दी होणार आहे. यामुळे जवळपास ३० हजार प्रेक्षक बसु शकतील अशी प्रेक्षा गॅलरी उभारली जात आहे.

आज महाराष्ट्राच्या संघाचे प्रशिक्षक शांताराम जाधव, व्यवस्थापक शंतनु पांडव, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, विजय मिस्कीन, प्रकाश बोरूडे, विनायक भुतकर, संतोष घोरपडे, अजय पवार, कृष्णा लांडे, सचिन सप्रे, संतोष गाडे यांनी मैदान उभारणीच्या कामाची पाहणी केली.

३२ संघ दाखल होणार
राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची मोठी जबाबदारी नगर शहरावर आहे. देशभरातील ८०० खेळाडू नगरमध्ये येणार आहेत. वेगवेगळ्या प्रांतातून ३२ संघ नगरमध्ये दाखल होणार आहेत. त्यांचे आदरातिथ्य आपल्याला करायचे आहे. मागीलवेळी राहिलेल्या सर्व त्रुटी भरून काढून उत्कृष्ठ पणे नियोजन केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमी खेळाडु, तसेच कार्यर्कत्यांना आवाहन आहे की ज्यांना स्वयंस्फूर्तीने काम करण्याची इच्छा आहे त्यांनी जरून संघटनेकडे नाव नोंदवून समितीची जबाबदारी घ्यावी व ही स्पर्धा यशस्वी करण्यास मदत करावी.
– प्रा. शशिकांत गाडे (उपाध्यक्ष, राज्य कबड्डी संघटना)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...