spot_img
अहमदनगरजूनचा हप्ता रखडला; लाडक्या बहिणींना एकाचवेळी मिळणार ३ हजार?

जूनचा हप्ता रखडला; लाडक्या बहिणींना एकाचवेळी मिळणार ३ हजार?

spot_img

मुंबई | नगर सहयाद्री
महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची आणि सध्या चर्चेत असलेली बातमी आहे. जून महिना संपत आला असतानाही, अजूनही या महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता खात्यात जमा झालेला नाही, त्यामुळे लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

लाभार्थींमध्ये सध्या अशी चर्चा आहे की, जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे का? याआधीही काही वेळा दोन महिन्यांचे हप्ते एकत्र जमा करण्यात आले आहेत, त्यामुळे अनेक महिलांना अपेक्षा आहे की जुलै महिन्यात त्यांचं खातं थेट ३ हजार रुपयांनी भरणार आहे.

मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. महिलांचा हप्ता खात्यात जमा करण्यापूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अधिकृत घोषणा केली जाते, मात्र जून हप्त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही.

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळेच आता जूनचा हप्ता जुलैच्या सुरुवातीला आणि त्यासोबतच जुलै हप्ता देखील एकत्र जमा होण्याची शक्यता अनेक महिला व्यक्त करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मैं समंदर हूँ, मै लौटकर वापस आयुंगा!; डॉ. सुजय विखे पाटलांच्या वक्तव्याने पारनेरच्या राजकारणात पुन्हा नवा ट्वीस्ट..

विधानसभेची पुनरावृत्ती होण्याचे संकेत | जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुजय विखे यांनी कसली पारनेरमध्ये कंबर राळेगण...

मोठी कारवाई! ४ वाळूतस्कर अडकले जाळ्यात; प्रवरा नदीपात्रात ‘असा’ लावला सापळा, जेसिबीने भरलेला ट्रॅक्टर, डंपर हायवा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) येथे प्रवरा नदीपात्रातून अवैधपणे वाळू उपसा...

सागर भिंगारदिवेसह साथीदारांवर गुन्हा दाखल! जामिनानंतर ‘ते’ प्रकरण भोवले…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्हा कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर सागर उत्तम भिंगारदिवे (रा.केडगाव, अहिल्यानगर) याने 70...

मोकळ्या जागेत मर्डर!; पोलिसांचा तपास सुरु, सकाळी-सकाळी उपनगरात काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव उपनगरातील बुलेट शोरूमच्या मागील मोकळ्या जागेत रविवारी (22 जून 2025)...