spot_img
अहमदनगर'महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचा संगमनेरमध्ये जल्लोष'

‘महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचा संगमनेरमध्ये जल्लोष’

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री-
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार निलेश लंके व शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा झाला. यावेळी गुलालांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी पेढे व जिलेबी वाटून आपला आनंद साजरा केला.

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयासमोर मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात, रणजीत सिंह देशमुख, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, संतोष हासे, रामहरी कातोरे,अजय फटांगरे, सुभाष सांगळे, जावेद शेख, वैष्णव मुर्तडक, सौ अर्चनाताई बालोडे ,सौ प्रमिलाताई अभंग, सौ दिपाली वर्पे, आदींसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचा युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीला अनुकूल निकाल येताच सर्व कार्यकर्त्यांनी यशोधन कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.

यावेळी आमदार थोरात म्हणाले की, हा विजय सर्वसामान्य जनतेचा असून सरकारचे चुकीचे धोरणे आणि राज्यात चुकीच्या पद्धतीने आलेल्या सरकार याविरुद्ध जनतेने रोष व्यक्त केला आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत असून सर्वांनी या विचाराच्या पाठीशी सोबत राहावे असे आवाहन करताना आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर मा. आमदार डॉ तांबे म्हणाले की, भाजपा सरकार देशांमध्ये एकाधिकारशाही निर्माण करू पाहत होते .मात्र समाजामध्ये निर्माण केली जाणारी द्वेष भावना आणि धार्मिकतेचे राजकारण जनतेला पसंत पडले नसून या विरोधी जनतेने मोठा कौल दिला आहे. तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाले की, भाजप सरकारने युवकांना फसवले .दोन कोटी नोकऱ्या तर सोडाच परंतु महाराष्ट्रातून अनेक उद्योग इतर राज्यांमध्ये पळवले. हे सर्वसामान्य जनतेला आणि तरुणांनी आवडले नसल्यामुळे तरुणाई पूर्ण भाजप सरकारच्या विरोधात ठामपणे उभी राहिली असल्याच्या त्या म्हणाल्या.

लोकसभा निवडणुकीत आमदार थोरात यांच्या प्रचाराला यश
महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये रामटेक, नागपूर ,गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, याचबरोबर मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी ,जालना, औरंगाबाद, उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नंदुरबार ,नाशिक, अहमदनगर, शिर्डी ,पश्चिम महाराष्ट्र मध्ये पुणे, शिरूर, कोल्हापूर ,सांगली ,सातारा, हातकणंगले,मुंबई, ठाणे, पालघर, अशा विविध ठिकाणी सभा घेतल्या यामध्ये अनेक महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले असून अनेकांनी आमदार थोरात यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली असून संगमनेरकरांचा हा गौरव असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी व महिलांनी व्यक्त केली आहे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा, झेडपी निवडणुकांचा ढोल वाजला

फेर प्रभाग रचना करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सरकारला निर्देश मुंबई | नगर सह्याद्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला निवडणुकीचा प्लान!, युती होणार नाही, त्या..

Maharashtra politics: चार महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे कोर्टाने आदेश...

अर्बन बँक घोटाळा प्रकरण: पुन्हा महत्वाची अपडेट,आरोपींवर कारवाई करा! मुख्यमंत्र्यांनाकडे कोणी केली मागणी? पहा..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: - नगर अर्बन (मल्टीस्टेट) को-ऑप. बँक (अहमदनगर) अहिल्यानगर ही नगर जिल्ह्यातील...

‘अहिल्यानगर मनपा आरोग्यात राज्यात पाचव्या क्रमांकावर’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे दरमहा जाहीर होणाऱ्या आरोग्य कार्यक्रमांच्या राज्यस्तरीय...