spot_img
अहमदनगरऑगस्टमध्ये बरसणार 'जोर धारा'; हवामान खात्याचा अंदाज, 'या' जिल्ह्याचा समावेश

ऑगस्टमध्ये बरसणार ‘जोर धारा’; हवामान खात्याचा अंदाज, ‘या’ जिल्ह्याचा समावेश

spot_img

अहमदनगर | नगर सहयाद्री
राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील तीन दिवस म्हणजे ३१ जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. नगर, नाशिक, पुण्यासह मराठवाडा सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १५ जिल्ह्यांत मध्यमच पावसाची शयता आहे. मात्र, त्यानंतर १ ऑगस्टपासून या जिल्ह्यांमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शयता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्यावतीने वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, रविवारी दुपारी नगर आणि परिसरात दोन तासांहून अधिक काळ मध्यम ते भीज स्वरूपाचा पाऊस झाला. सायंकाळपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती.गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात अनेक भागात पावसाची रिमझिम सुरू आहे. यामुळे खरीप हंगामील पिके जोमात असली तरी त्यावर रोगांचा प्रादूर्भाव दिसत आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील आठवडाभर मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत तर मध्यम पावसाची शयता आहे.

यासह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागातील नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव सहित संपूर्ण विदर्भातील अशा १५ जिल्ह्यांत आठवडाभर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यांत अतिजोरदार पाऊस थांबवण्याची शयता दिसत नाही. मराठवाड्यातील जायकवाडी व इतर लघु-प्रकल्पांतील धरणे वगळता या चालू आठवड्यात इतर सर्व धरणांत पडणार्‍या पावसामुळे वाढ हाणेार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भारताचा ऐतिहासिक कसोटी विजय!; आशिया खंडातील विजय मिळवणारा पहिला देश

IND vs ENG 2nd Test: भारताने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला तब्बल...

निसर्ग कोपला, पावसाचा कहर!, 75 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी…

Himachal Pradesh:हिमाचल प्रदेशात ढगफुटीमुळे पडत असलेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झाले असून, अनेक गावांचा...

वारकरी दाम्पत्यावर काळाचा घाला; टँकरच्या धडकेत पती-पत्नी ठार

श्रीगोंदा । नगर सहयाद्री पंढरपूरची वारी करून घरी परतत असताना येळपणे (ता. श्रीगोंदा) येथील...

नगरमध्ये गुटख्याची वाहतूक करणारी टोळी पकडली!

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- गुटख्याची वाहतूक करणार्‍या टोळीवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष...